फक्त अधिवेशनापुरत्या कारवाया नकोयं..,; FDA च्या कारवाईवर आमदार पाचपुतेंनी ठेवलं बोट
FDA च्या कारवाया फक्त अधिवेशनापुरत्याच नको तर सातत्याने सुरु राहिल्या पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी केलीयं.
Mla Vikram Pachpute : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई फक्त अधिवेशनापुरती नकोय, सातत्याने सुरु राहिल्या पाहिजेत, अशी मागणी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी केलीयं. सध्या अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कारवाया सुरु आहेत. या कारवायांचं कौतुक करतानाच आमदार पाचपुते यांनी FDA विभागाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय.
अल्पवयीन बेपत्ता आदिवासी मुलीला थेट विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अहिल्यानगरातील धक्कादायक प्रकार
पुढे बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, मार्च 2025 साली मी सभागृहात प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी मी सरकारला विनंती केली होती. जे अधिकारी काम करीत नाही त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मार्च 2025 ला पनीरबाबत मी प्रश्न मांडला. तेव्हा अनेकांना ही गोष्ट माहितही नव्हती. तेव्हाच हा प्रश्न चर्चेत आला. त्यानंतर घरोघरी चर्चा झाली. त्यावेळी काही कारवाई झाल्या होत्या. जेव्हा जेव्हा मार्च जवळ येतो तेव्हा कारवाया सुरु होतात, परंतू या कारवाया फक्त अधिवेशनापुरत्या मर्यादित न राहता सुरुच राहिल्या पाहिजेत, असं आमदार पाचपुते म्हणाले आहेत.
सरकारी कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा होण्याची शक्यता, अनिल घनवट यांचे केंद्र सरकारला पत्र
अन्न औषध प्रशासनाच्या कारवाया संदर्भात पाचपुते यांनी सांगितले की मार्च 2025 मध्ये विधानसभेत अनलॉग चीज आणि पनीरबाबत मी प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्यात कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुलै 2025 मधील अधिवेशनातही हा मुद्दा मांडल्यानंतर पुन्हा कारवाईचा वेग वाढला.
तसेच मागील मार्च महिन्यात कृत्रिम फुलांच्या विक्रीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने कारवाया केल्या होत्या आता पुन्हा पुढील महिन्यात अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे होतं असलेल्या कारवाया या केवळ अधिवेशनापुरत्या मर्यादित न ठेवता वर्षभर सातत्याने सुरू राहाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एक प्रकारे पाचपुते यांनी FDA च्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवल्याने सातत्याचा मुद्दा एरणीवर आला आहे.