जागावाटपात मोदी-शाहचां निर्णय अंतिम! शिंदे गटाकडून नरमाईची भूमिका?

  • Written By: Published:
जागावाटपात मोदी-शाहचां निर्णय अंतिम! शिंदे गटाकडून नरमाईची भूमिका?

राज्यात निवडणुकांना अजून बराच काळ शिल्लक असतानाच गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाटपावरून संघर्ष दिसत होता. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देणार असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना नेते आमने सामने आले.

पण आता शिंदे गटाकडून या सगळ्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न चालू चालू आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेला किती जागा द्यायच्या याचा निर्णय घ्यावा, आम्ही तो शिरसावंद्य मानू. अशी भूमिका घेतली आहे.

सावंतांची राणा पाटलांवर कुरघोडी : Eknath Shinde यांनी दिला भाजपबरोबर ‘मविआ’ला धक्का!

काय म्हणाले होते बावनकुळे?

काही आठवड्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहा, असं भाजप कार्यकर्त्यांना सांगितलं होत.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागा आहेत. या निवडणुकीत आपला पक्का विजय आहे. १६०-१६५ जागांवर भाजप निवडून येईल. या निवडणकीत भाजपनं २४० जागा लढवण्याची तयारी केली आहे. तर शिवसेनेला केवळ ४८ जागा मिळतील. कारण शिवसेनेकडे ५० पेक्षा जास्त जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत. असं बावनकुळे म्हणाले होते.

Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याकरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद रंगला होता. शिवसेनेकडून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. पण आता त्यावर सारवासारव केली जात असल्याच दिसतंय. सांगली येथे बोलताना शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेला किती जागा द्यायच्या याचा निर्णय घ्यावा, आम्ही तो शिरसावंद्य मानू.

याशिवाय महाराष्ट्रातील विद्यमान सरकार आपला कालावधी पूर्ण करेल आणि त्यानंतर जेव्हा निवडणुका होतील, त्या वेळी सत्ताधारी युतीतील शिवसेनेच्या जागा ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा मोदी व शहा यांनाच असेल. शिवसेनेला ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढवू आणि महाशक्ती असलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाने आम्हाला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube