कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यांच्यावर कारवाई करा; ठाकरेंच्या खासदाराचे पटोलेंना पत्र
Sanjay Jadhav Letter To Nana Patole : परभणी लोकसभा (Parbhani Lok Sabha) निवडणुकीत संजय जाधवांनी (Sanjay Jadhav) सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. असं असलं तरी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी आपल्या विरोधात काम केल्याची तक्रार संजय जाधवांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे पत्रातून केली.
इंडिया आघाडी विरोधात बसणार, सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही; सूत्रांची माहिती
कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आघाडीचा धर्म न पाळता विरोधी उमेदवाराचा खुलेआम प्रचार केला. याशिवाय या सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परभणी मतदारसंघात जातीयवाद पसरवून मतदारांवर दडपशाही केली. विरोधी उमदेवारासोबत फिरून राज्यातील आणि देशातील कॉंग्रेस नेतृत्वाबाबत अपशब्द वापरून अनेक ठिकाणी त्यांचा अवमान होईल, असं पक्ष विरोधी वर्तनही केल्याचं या पत्रात म्हटलं.
हार्दिक, बुमराह चमकले, भारतीय गोलंदाजांचा कहर, आयर्लंडने दिले 97 धावांचं टार्गेट
जाधव यांनी या पत्रात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नाना राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे, काँग्रेस ओबीसी सेलचे केशव बुधवंत, राजू नागरे, काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम साठे, माजी नगरसेवक विशाल बुधवंत, विश्वजित बुधवंत, हरिभाऊ शेळके, माजी नगरसेवक बबलू नागरे याच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी महादेव जानकर यांचा ताकदीनिशी प्रचार केला.
या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरून मोदी-फडणवीसांचे कौतुक केलं. त्यांनी आघाडी धर्म न पाळल्यानं त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जाधवांनी केली. दरम्यान, जाधव यांच्या पत्राची दखल घेऊन नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार का? हे काही दिवसांत स्पष्ट होईल.