Maharashatra Election : प्रचाराची तोफ आज थंडावणार…शेवटचा दिवस कोण गाजवणार?

मनपा निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून आज सायंकाळी 5 : 30 वाजल्यापासून प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

Untitle

Muncipal Coroporation Election : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज भरल्यानंतर जोरदार तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळालं. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून आज सायंकाळी 5 : 30 वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांचे रोड शो, जाहीर सभा, दारोदारी प्रचार बंद होणार आहे.

माझ्या उमेदवारांना 15 कोटींची ऑफर; ठाण्यातील सभेत राज ठाकरेंचा भाजपवर थेट प्रहार

महापालिका निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असून आत्तापासून अवघे काही तासच उरले आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर प्रचारांच्या तोफा थंडावणार असून उमेदवारांच्या सभा रोड शोंचा धडाका बंद होणार आहे. काही काळच प्रचारासाठी उरला असल्याने
उमेदवार मतदारांच्या दारोदारी फिरत आहेत.

‘शब्द शिवसेनेचा’ जाहीरनाम्याच्या माध्यमातून कायापालट करणार; उमेदवार संदीप लोणकर यांचा निर्धार

मागील तीन दिवसांपासून प्रत्येक पक्ष, अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढलेला दिसून येत होता. आज अखेरचा दिवस असल्यानेउमेदवारांनी प्रभाग पिंजून काढलायं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेत संबोधित केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत सभा घेतली. शेवटच्या टप्प्यात घेतलेल्या सभांची संपूर्ण राज्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

Video : पुण्यातून उडणाऱ्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ.. फडणवीस दादांनंतर टाकणार होते डाव

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या नियमानूसार मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास मनाई असते. मतमोजणी होईपर्यंत ड्राय डे पाळला जातो. या काळात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यावर कडक कारवाई तसेच कार्यकर्त्यांकडून अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाते. त्यामुळे आता आज सायंकाळी 5 : 30 वाजल्यापासून उमेदवारांकडून सुरु असलेला प्रचार थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे.

follow us