Nana Patole : काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे वारे?; पटोलेंच्या विधानानं अनेकांची धडधड वाढली

Nana Patole  : काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचे वारे?; पटोलेंच्या विधानानं अनेकांची धडधड वाढली

Nana Patole : आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2014 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारींची नियुक्ती केली. भाजपने राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी 48 आणि विधानसभा मतदारसंघांसाठी 288 प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, आता काँग्रेसनेही लवकरच प्रभारी नियुक्त करणार असल्याचं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले आहे. (Nana Patole said  Congress will soon appoint election in-charge)

आज नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसी संवाद साधतांना ते म्हणाले की, येणारं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे. त्यामुळं आता कॉंग्रेसनेही तयारी सुरू केली. कॉंग्रेसला लोकसभा आणि विधासभा निहाय प्रभारीही बदलायचे आहेत. लवकरच प्रभारींची नेमणूक करणार आहे. प्रभारी नेमणूक झाल्यावर आम्ही संघटनात्मक बदल करणार आहोत. जिल्हाध्यक्ष अनेक ठिकाणी बदलवले जातील, प्रदेशध्यक्ष बदलवू. कॉंग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल येणाऱ्या काळात होणार आहेत. पदाधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्यावर जबाबदाऱ्या देण्यात येतील, असं बावनकुळे म्हणाले.

‘अजितदादांना योग्य संदेश दिलाय’; राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष निवडीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया 

काल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या अध्यक्ष म्हणून माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्णी लागली. त्यावरून पत्रकारांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी असल्यानं ही नियुक्ती केली, असा संदेश दिलाय का, असं विचारताच पटोले म्हणाले, संघटनात्मक बदल करण्यासाठी असे निर्णय घेतले जातात. मला वाटतं, यावर अजून चर्चा करण्याचं कारण नाही, असं पटोले म्हणाले.

आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होते. यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, २०१४ मध्ये किती आश्वासनांची पूर्तता केली हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लोकांना सांगावं लागेल. जूमले आता चालणार नाहीत, त्यामुळे सभा किती झाल्या, कोण सभा घेतंय, याचा काही परिणाम होणार नाही. कर्नाटक निवडणुकील विजय पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube