Narayan Rane यांचा हल्ला : आदित्य ठाकरे कोरोनात टेंडरमागे १५ टक्के कमिशन घ्यायचा!
Narayan Rane Vs Uddhav Thackeray : अडीच वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाचा कहर होता. लोकं मरत होती. पण मातोश्रीवाले घरी बसून टक्केवारी कमवत होते. कोरोनात प्रत्येक टेंडरमागे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे १५ टक्के कमिशन घेत होते, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याची जहरी टीका केली होती. त्यामुळे भाजपाचे मंत्री, आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल सुरु केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अशी जहरी टीका फडणवीस यांच्यावर केली. यावरूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.
Narayan Rane यांची ‘फडतूस’ वादात उडी! उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला कलंक… – Letsupp
नारायण राणे म्हणाले की, कोरोनाच्या काळात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून औषधांच्या प्रत्येक टेंडरमधून १५ टक्के पैसे घेण्यात आले आहेत. टक्केवारी घेण्याशिवाय यांनी काय काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बघून राज्यात आजपर्यंत शिवसेनेत कोणी प्रवेश केला का? मुख्यमंत्री असताना त्यांचे नेतृत्व कुणी स्वीकारले का?, असा सवाल देखील राणे यांनी यावेळी विचारला.
राज्याचे माजी निष्क्रिय पण मातोश्रीचे मुख्यमंत्री हे ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला काल गेले होते. ज्या मुलीवर हल्ला झाला म्हणून सांगत आहे. ती मुलगी गर्भवती नाही. डॉक्टरांचे सर्व रिपोर्ट माझ्याकडे आहेत. त्यात फक्त तिला मुक्कामार लागला आहे. उद्धव ठाकरेंनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा काल त्यांनी केली आहे, असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.