अजितदादांचे स्टार प्रचारक ठरले; मुश्रीफ, तटकरे, मुंडे, भुजबळांवर सोपवली जबाबदारी…
Ncp Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ncp Ajit Pawar Group) स्टार प्रचारक ठरले आहेत. स्टार प्रचारकांमध्ये अजितदादांनी दिग्गज नेत्यांवर जबाबदारी सोपवली असून यामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुबजळ, रुपाली चाकणकर यांच्यासह एकूण 27 जणांवर जबाबदारी सोपवण्यात आलीयं. यासंदर्भातील माहिती अजित पवार यांनी सोशल मीडियावर दिलीयं.
महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार,
राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..!विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत… pic.twitter.com/0ph5JqMhDG
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 21, 2024
अजित पवार यांनी पोस्ट केलेल्या शेअरमध्ये म्हटले, “महाराष्ट्रात फक्त गुलाबी वादळ घोंघावणार, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे जोमानं फिरणार..! विकासाचा राष्ट्रवादी विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक कोण?
अजित पवार
प्रफुल्ल पटेल
सुनिल तटकरे
छगन भुजबळ
दिलीप वळसे
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवळ
आदिती तटकरे
नितीन पाटील
सयाजी शिंदे
अमोल मिटकरी
जल्लाउद्दीन सय्यद
धिरज शर्मा
रुपाली चाकणकर
इंद्रिस नायकवडी
सुरज चव्हाण
कल्याण आखाडे
सुनिल मगरे
महेश शिंदे
राजलक्ष्मी भोसले
सुरेखा ठाकरे
उदयकुमार आहेर
शशिकांत तरंगे
वासिम बुऱ्हाण
प्रशांत कदम
संध्या सोनवणे
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची धामधूम सुरु असून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. अशातच अजित पवार यांनी निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मैदानात स्टार प्रचारक उतरवले आहेत.