‘चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी…’; तटकरेंचे पवारांवर टीकास्त्र

‘चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटणाऱ्यांनी…’; तटकरेंचे पवारांवर टीकास्त्र

Sunil Tatkare on Sharad Pawar : राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन (NCP Foundation Day) साजरा होत असून, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसदार असल्याचा ढिंढोरा पिटवणारे असा उल्लेख करत त्यांनी पवारांवर टीका केली.

विधानसभेला शिंदें इतक्याच जागा आम्हाला हव्यात; भुजबळांनी जागा वाटपाचा सूर आवळला अन् भितीही सांगितली ! 

यावेळी बोतलाना तटकरे म्हणाले की, तुम्हाला मंत्रिपदाचा सात वर्षाचा अनुभव होता. त्यामुळं तुम्ही मुख्यमंत्री झाला. मग 2004 साली अजित पवारांनाही सात वर्षाचा मंत्रिपदाचा अनुभव होता. तरीही अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का नाकारलं?, असा सवाल तटकरेंनी केला.

‘…त्याबद्दल शरद पवारांविषयी मी कृतज्ञ’; वर्धापन दिनाच्या भाषणात अजितदादा भावूक 

पराभवाची जबाबदारी सर्वांचीच…
पुढं बोलतांना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली, याची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून, ही त्यांची एकट्याची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची आहे. हा पराभव एकट्या अजितदादांचा पराभव नसून राष्ट्रवादीच्या सर्वाचाच आहे, असं तटकरे म्हणाले.

तटकरे म्हणाले की, एका गोष्टीचं शल्य जरूर आहे की, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारसरणीचे वारसदार आम्हीच आहोत, असा ढिंढोरा पिटणारी काही मंडळींकडून लोकसभेच्या निवडणुकीत सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रचारसभांतून अजित पवारांवर क्लेषकारक विधानं केली. टीका जरूर व्हावी, पण ती धोरणांवर व्हावी, असं तटकरे म्हणाले.

16-16-16 चा फॉर्म्युला ठरला होता..
2014 साली राज्यात चारही पक्ष वेगवेगळे लढले. निवडणुकीचे निकाल लागताच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपसोबत जाण्याची सुरूवात 2014 मध्येच झाली. त्याआधी 2009 साली शिवसेनेबरोबर जाण्यासंदर्भातही विचारल झाला होता. 2014 साली 16-16-16 चा फॉर्म्युला ठरला होता, असा दावाही तटकरेंनी कला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज