Jitendra Awhad : मला अडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना दहा-दहा तास बसून ठेवतात, आव्हाडांचा गौप्यस्फोट
Jitendra Awhad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाणे येथे आज महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिंतेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. त्याच्या निषेधार्थ आज ठाण्यामध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आव्हाडांनी बोलताना जोरदार टीका केली आहे.
रोशनी शिंदे हीच्या गेल्या वर्षभरातील सगळ्या पोस्ट मी काल वाचून काढल्या. त्यामध्ये कुठेही अश्लाघ्य भाषा वापरण्यात आलेली नाही. याउलट तिने केलेल्या सर्व पोस्ट या शिवसेनेच्या संस्कारातल्या होत्या, असे आव्हाड म्हणाले आहेत. संस्कार विचारल्याबद्दल या लोकांनी रोशनीताईला मारहाण केली. यावेळी तिने सांगितले की माझी मातृत्वाची ट्रिटमेटं चालू आहे तरी देखील तिला मारहाण करण्यात आली हे त्यांचे संस्कार आहेत, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
आ देखे जरा किसमे…सुषमा अंधारेंचं बावनकुळेंना खुलं चॅलेंज…
यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावरुन देखील सरकारवर निशाणा साधला आहे. त्याने माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन सभागृहात सर्व आमदरांना हा प्रश्न विचारला की, माझ्या मुलीऐवजी तुमची मुलगी असती तर काय केले असते, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
Rajan Vichare : पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जाताहेत
यावेळी आव्हाडांनी आहेर याचे बारावीचे सर्टिफिकेट दाखवले व उत्तर प्रदेश येथून त्याने बारावी केल्याचे सांगितले. तसेच त्याचे ग्रॅज्युएशन हे सिक्कीममधून झाले असल्याचे आव्हाडांनी सांगितले. त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण मला अडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना दहा-दहा तास बसवून ठेवले जाते, असा आरोप आव्हाडांनी केला आहे. या सभेसाठी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, राजन विचारे, सुषमा अंधारे हे नेते उपस्थित होते.