‘काहीही झालं तरी झुकणार नाही’; ईडीची चौकशी संपताच रोहित पवारांनी ठणकावलं

‘काहीही झालं तरी झुकणार नाही’; ईडीची चौकशी संपताच रोहित पवारांनी ठणकावलं

Rohit Pawar ED Inquiry : बारामती अॅग्रो प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सकाळपासूनच रोहित पवार यांची मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. अखेर 12 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवार ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. चौकशीनंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काहीही झालं तरी झुकणार नसल्याचं ठणकावूनच सांगितलं आहे.

भाजपच्या गळाला बडा मासा : काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्याविरोधातील उमेदवार ठरला?

रोहित पवार म्हणाले, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करेन. ही अधिकाऱ्यांची ड्यूटी असते. चौकशी सुरु होती तेव्हा अनेक लोकं थकतात, घाबरतात काय करावं काय कळत नाही पण तिथं बसलो होतो तेव्हा कार्यकर्त्यांचा आवाज माझ्या कानावर येत होता. त्यातून मी प्रेरणा घेत होतो. ईडीची चौकशी सुरु आहे तरीही मी काहीही झालं तरी झुकणार नसल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Ram Mandir सोहळ्यात गाजला ज्युबिन नौटियाल, ‘मेरे घर राम आये हैं’ ने घेतला भाविकांच्या मनाचा ठाव

तसेच कार्यकर्ता अडचणीत येतो तेव्हा बापमाणूस त्याच्यासोबत असतो. शरद पवारांना लढणारी माणसं आवडतात. पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे असतात. हा मार्ग संघर्षाचा आहे. आपल्या विचारांचा वारसा जपण्यासाठी संघर्षाची भूमिका तयारी सर्वांना ठेवावी लागेल. स्वाभिमानी नागरिकांना एकच विनंती मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी ठरवलं की लढायचं त्यांच्यासाठी अधिकारी जे काही फाईल मागताहेत त्याचं सहकार्य आपण करत आहोत, 12 तासांच्या चौकशीनंतर येत्या 1 तारखेला मला पुन्हा बोलावलं आहे. जी माहिती मागितली ती माहिती मी दिलेली असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून येणारे चौकशी समन्स आणि चौकशी सत्र चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. समन्सनंतर रोहित पवार आज ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठं शक्तीप्रदर्शन केल्याचं दिसून आलं होतं. रोहित पवार यांना चौकशीला सोडायला खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर ईडीची चौकशी संपल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आल्याचं दिसून आलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube