‘हे तर भ्रष्ट जुमला पार्टीचं षडयंत्रच’; नवाब मलिक प्रकरणावर सुळेंनी मौन सोडलं

‘हे तर भ्रष्ट जुमला पार्टीचं षडयंत्रच’; नवाब मलिक प्रकरणावर सुळेंनी मौन सोडलं

Supriya Sule On Nawab Malik : जामिनावर बाहेर असलेले अनेक नेते मंत्री, नवाब मलिकांना (Nawab Malik) न घेणं हे भ्रष्ट जुमला पार्टाचं षडयंत्रच असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच वातावरण तापल्याचं दिसून आलं. अशातच नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना चांगलचं घेरलं. त्यानंतर आता नवाब मलिकांना महायुतीत घेता येणार नसल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. त्यावरुन सुप्रिया सुळेंनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे.

छ. संभाजीनगरच्या लेकाची गगनभरारी! समीर शाह BBC चे नवे अध्यक्ष, तीन दिवस काम अन् कोटींचा पगार

सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवाब मलिक जामिनावर बाहेर आहेत. अनेक नेते जामिनावर बाहेर आहेत, आणि ते मंत्री आहेत. भ्रष्ट जुमला पार्टीने सिलेक्टीव्हीला ही गोष्ट करणं, यामागे काय षडयंत्र आहेस त्याचा अभ्यास करावा लागेल. ड्रग्ज माफिया विरोधात नवाब मलिकांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांना न घेणं ही त्यांची फसवणूक झाल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसेच राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा सुप्रिया सुळे प्रत्येक वेळी गेली आहे. भुजबळांच्या वेळीही गेले होते ती आमची नैतिक जबाबदारी होती. जेलमध्ये असले तरी अडचणीच्या काळात मी मदतीला धावून गेली आहे. संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिकांचं अशी अनेक कुटुंब आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा मी कुटुंबाला भेटायला मी गेली होती. हे सगळं अदृश्य शक्ती करत आहे. पारदर्शकपणे लोकांमध्ये जाऊन आम्ही न्याय मागितला. आम्ही कधीच सुडाचं राजकारण केलं, भाजपकडून सुडाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोपही सुळे यांनी यावेळी केला आहे.

Priyanka Chopra Deepfake: आलिया, दीपिका नंतर आता प्रियंका चोप्रा डीप फेकच्या जाळ्यात!

केंद्रीय यंत्रणा आज जे काम करीत आहे त्यांचा अभिमान पण सध्या अदृश्य शक्तीच सगळं करीत आहे. विधानसभेत बसण्यासाठी जागा अध्यक्ष देतात पण मला माहित नाही त्यांना जागा दिली होती की नाही . जयंत पाटील आणि नवाब यांच्याशी बोलल्यावर समजेल की काय खरं? असंही त्या म्हणाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयाने आज (7 डिसेंबर) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खिंडीत गाठत त्यांनीच ज्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आणि दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार केल्याच्या आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले असल्याचा दावा केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube