‘वर्षा’ बंगल्यावर काय-काय घडलं…जयंत पाटलांची भेट अन् विलिनीकरण? सुनिल तटकरे सगळं बोलले…

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत जयंत पाटलांसोबतही भेट झाली की नाही? याबाबत खासदार सुनिल तटकरेंनी भाष्य केलंय.

Sunil tatkare

Sunil Tatkare News : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ-मोठ्या घडामोडी घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असून महायुतीत सामिल होण्याची चर्चा रंगू लागलीयं. याच चर्चांना सूर मिळाला तो शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील, (Jayant Patil) अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घेतलेल्या भेटीने. या संपूर्ण घडामोडींवर जयंत पाटलांनी काल माहिती दिली. त्यावर आता सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनीही पत्रकार परिषद घेत मौन सोडलंय.

पंडित अजित कडकडे यांच्या भावस्पर्शी आवाजातील ‘श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ गीत सप्तसूर म्युझिकवर प्रदर्शित

दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र, या बातम्यांचं तटकरे यांनी काल खंडन केले. सध्या सुरु असलेल्या चर्चा चुकीच्या असून जयंत पाटील आणि आमची भेट झालेली नाही. आमची भेट ही नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने झाली. या भेटीबाबत सुनेत्रा पवार यांना माहिती होती. आमच्यात चांगले ट्युनिंग असून आम्ही सोमवारी भेटणार होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी होणारी प्रत्येक भेट ही राजकीय असते असं नाही. मतदारसंघातील कामेही असतात. मी 40 वर्षांपासून राजकारणात असून मला राजशिष्टाचार माहिती असल्याचं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलंय.

ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्याने आठवण करून देणारी एक कथा…

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दोन्ही राष्ट्रवादीतील तीन बडे नेते एकत्र आल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस यांच्यासोबत भेटी दरम्यान जयंतराव पाटील नव्हते. त्यांच्याशी भेट झाली नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. जयंत पाटील आले आणि आम्ही फडणवीसांकडे गेलो आणि अर्थखाते मागितले हा कुठला तर्क मांडला हेच मला कळलं नाही. जयंत पाटील यांचा याच्याशी काय संबंध? जयंतरावांनी काल त्यांची भेट कशासाठी झाली हे कालच स्पष्ट सांगितलं.

विद्यार्थ्यांची आत्महत्या तरीही मोदींना पाझर फुटत नाही…अण्णांच्या आंदोलनाची आठवण करुन देत शेट्टींची टीका…

जयंतराव सुद्धा वरिष्ठ नेते आहेत. एकत्रित राष्ट्रवादीचं काम त्यांनी पाहिले आहे. ते अनुभवी नेते आहेत. ते स्वयंभू नेते आहेत. राज्याचं अर्थखातही त्यांनी पाहिलं आहे. आमच्या दोघांच्या भेटीचा आणि जयंतरावांच्या भेटीचा दुरान्वयेही, काडीमात्र काही संबंध नाही. माझी भेट माझ्या मतदारसंघातील कामानिमित्त झाली. मी अगोदरच्या दिवशी भेट मागितली. त्यादिवशी त्यांच्या कोअर कमिटीची बैठक होती. तर प्रफुल्ल पटेल यांना बाहेर जायचे होते, त्यामुळे तेही सोबत आले, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

follow us