दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी मी…, आदित्य ठाकरेंचं सुटलं मौन

दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी मी…, आदित्य ठाकरेंचं सुटलं मौन

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात येत आहेत.

विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील भाजपच्या विधानसभा सदस्यांकडून हा मुद्दा जोरदार उचलून धरला असून दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याबाबत मागणी करण्यात आली. या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी अभिनेता सुशांतसिह राजपूत प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन करण्यात आला, असा शेवाळेंनी लोकसभेत म्हटलं.

खासदार राहुल शेवाळेंनंतर आता भाजप आमदार नितेश राणेंनीदेखील या वादात उडी मारली असून नितेश राणेंनी कोणाच्या राजकीय दबावामुळे दिशा सालियन प्रकरणाचा तपास बंद केला. दिशाच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलं. ८ जूनच्या पार्टीत कोण कोण होतं, याची चौकशी झाली करण्याची मागणी नितेश राणे यांनी केली होती.

राज्यभरात पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरण चर्चेत आलं असून या सर्व आरोपांवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडत विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
ज्या दिवशी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता, त्यादिवशी माझ्या आजोबांचं निधन झालं होतं. त्यामुळे मी रुग्णालयात होतो. त्यांना काढायचं ते काढून द्या. पण, सत्य आहे ३२ वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरलं आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोटाळा काढून हादरवून ठेवलं आहे.

विरोधकांचा मुखवटा फाडून खरा चेहरा दिसत आहे. लाज वाटते आणि किळसही येते, कधीकाळी ते आमच्याबरोबर होते. बरं झाले तिकडे गेले आणि खरा चेहरा दाखवत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना गुंतवणूक, रोजगारासाठी काम करत होतो. कर्नाटकच्या विरोधात आम्ही बोलत होतो. महाराष्ट्राची ताकद आणि हिंमत दिसत होती. पण, आता कर्नाटक आणि शेतकऱ्यांवर बोलायला तयार नाही.

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची अखेर एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे. आता एसआयटी मार्फत होणाऱ्या चौकशीनंतर काय निष्पण्ण होणार? याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube