काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. […]
काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधीमंडळ परिसराच्या आवारात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना डोळा मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची बरीच चर्चादेखील झाली होती. एवढेच काय तर, यातून अनेक अर्थदेखील काढण्यात आले होते. मात्र, आता अजितदादांच्या या कृतीवर स्वत त्यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. चुकून डोळा बंद […]
Uddhav Thackery Reaction On Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मोदी आडनावावर टीका केल्याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनवली आहे. या प्रकरणात सध्या राहुल गांधी यांना जामीन देण्यात आला असून, राहुल यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आता देशभरातील राजकीय वातावरण तापलं आहे. […]
विधानपरिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काल विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या फोटोला जोडेमारो आंदोलन केले होते. यावरुन काँग्रेस नेते जोरदार आक्रमक झाले आहेत. ज्या सदस्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येते आहे. यावरुनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसच्या […]
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले […]
मुंबई : गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, (Maharashtra Vidhan Sabha) महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत जोरदार निदर्शने केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा […]