‘आपल्याविरुध्द बोलणाऱ्याला हुकूमशाह घाबरतात, जे सत्यासाठी लढतात…’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Aditya Thackeray : दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाप्रकरणी ठाकरे गटाने जनता न्यायालय भरवत कायद्याच्या भाषेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर काही तासांतच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. कथित खिचडी वितरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने 17 जानेवारी रोजी सूरज चव्हाण यांना अटक केली होती. तर राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (18 जानेवारी) छापे टाकले. यावरून आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.
‘…तर सरळ गुन्हा दाखल करून अटक करेल’; भारत जोडो न्याय यात्रा आसामध्ये दाखल होताच CM सरमांचा इशारा
आज माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, जे देशभक्त आहेत, जे सत्यासाठी लढत असतात त्यांनाच हैराण केलं जात आहे. ईडी, सीबीआय, आयटी हेच फक्त सत्तेतील लोकांचे मित्र आहेत. आणि या यंत्रणांच्या माध्यमातून अटक केली जाते. मी आधीपासून सांगतोय, जेवढी हुकमशाहांची राजवट पोकळ असते, तेवढ्या एजन्सीजचा गैरवापर सत्ताधीश करत असतात. आपल्याविरुध्द बोलणाऱ्याला हुकूमशाह घाबरतात. हिटरलासारखचा भाजप पक्ष घाबरलेला आहे. त्यामुळं जे निडरपणे सत्यासाठी, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढत असतात, त्यांना हैराण केलं जातं. सूरज चव्हाण आणि राजन साळवी हे कायम सत्य, लोकशाही यासाठी लढत आले. सत्तेकडून आलेले प्रलोभने त्यांनी धुडकाऊन लावल्यानं त्यांना त्रास दिला जात आहे, असं ठाकरे म्हणाले.
Solapur : असंघटीत कामगारांची गृह स्वप्नपूर्ती! 30 हजार गृह प्रकल्पाचं PM मोदींच्या हस्ते उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला होता. या पन्नास जणांच्या शिष्टमंडळातील लोक हे सरकारशी संबंधीत नाहीत, काहींनी आपल्या मुलांनाही सोबत नेलं असा आरोप त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी दावोस दौऱ्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, दावोसमध्ये दोन पत्रकार आणि काही जणांना आणि दलालांना नेलेलं आहे. आम्हाला सर्व माहिती मिळालेली आहे. आमच्याकडे फोटोस आलेले आहेत. आता सध्या त्यांना थंडी एन्जॉय करू द्या, ते आल्यावर आम्ही वातावरण गरम करणार आहोत. सगळे फोटो वैगरे आमच्याकडे आलेले आहेत. दावोसचे करार आम्हाला माहिती आहेत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सीएम शिंदेंना इशारा दिला.