फलटणमध्ये बिग फाईट : रणजितसिंह -रामराजे पुन्हा एकदा भिडणार !

Phaltan Magarpalika Election: फलटण नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. याच दिवशी दोघांकडूनही राजकीय खेळी.

  • Written By: Published:
RanjeetsinghNaik Nimbalkar Vs Ramraje Nimbalkar

Phaltan Nagarpalika Election : राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीमध्ये फूट पडलीय. तशीच फूट आता सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपालिकेत (Phaltan Nagarpalika Election) पडलीय. या नगरपालिकेत ही फूट पडणारच होती. कारण भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर (
RanjeetsinghNaik Nimbalkar) व विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे एकमेंकाना पाण्यात पाहतात. दोघेही महायुती असले तरी दोघांमधून विस्तव काही जात नाही. दोन्ही मातब्बर नेत्यांमधील संघर्ष लोकसभा, विधानसभा निवडणूक, डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणात उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय. आता दोघांमधील वादाचा नवा अंक फलटण नगरपालिकेत पाहिला मिळणार आहे. (Phaltan Nagarpalika Election Ramraje Naik Nimbalkar vs RanjeetsinghNaik Nimbalkar)


रणजितसिंह निंबाळकराच्या भावाविरुद्ध मुलाला मैदान उतरविले

फलटण नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. याच दिवशी दोघांकडूनही मोठी राजकीय खेळी पाहिला मिळाली. सध्या तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले रामराजे निंबाळकर यांनी अखरेच्या क्षणी आपले पत्ते उघडले. त्यांनी मुंबईत जावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय आणि थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी पदरात पाडून घेतलीय. त्यांचा मुलगा अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला.


अनेकजन गुडघ्याला बाशिंग बांधून असताना जागा राखीव, बीडमध्ये नेत्यांचे डाव प्रतिडाव


भाजपने लगेच नगराध्यक्षपदाचा उमेदवार बदलला

नगराध्यक्षपदासाठी भाजपने दुसरा उमेदवार शोधला होता. पण रामराजे निंबाळकरांनी आपला मुलगा रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेताच भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी आपले बंधू समशेर निंबाळकरांना नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरविले. त्यामुळे आता दोन्ही निंबाळकरांमध्ये फाइट होत असल्याने फलटण राजकारणात तापणार आहे.

अनगर नगर पंचायतीत भारतीय जनता पार्टीचे 17 पैकी 17 नगरसेवक बिनविरोध; काय घडलं?


आमदाराची भाजपला साथ

विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेंकाविरुद्ध उभे ठाकले होते. परंतु अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव केला होता. सचिन पाटील हे मूळचे भाजपचे आहेत. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजपबरोबर आहे.


रामराजे निंबाळकरांचा पक्ष कोणता ?

रामराजे निंबाळकर यांची राजकीय भूमिका बदलत राहिलीय. रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध ते कट्टर भूमिका घेत राहिले. परंतु ते कोणत्या राष्ट्रवादीत आहेत हा प्रश्न सर्वांसमोर होता. परंतु अजित पवार यांच्या एका बैठकीला ते उपस्थित राहिले. त्यामुळे ते अजितदादांबरोबर असल्याचे बोलले जात आहे. परंतु आता त्यांनी मुलगा शिवसेनेत पाठविलाय. त्यामुळे ते ही भविष्यात एकनाथ शिंदेंबरोबर जावू शकतात, अशा शक्यता वर्तविल्या जात आहे. आता नगरपालिकेमध्ये दोन निंबाळकर थेट लढतायत. त्यामुळे फलटणच्या मतदारांमध्ये कोणत्या निंबाळकरांवर प्रेम आहे हे आता समजणार आहे. परंतु तोपर्यंत दोन निंबाळकरांविरुद्ध तगडी फाईट, एकमेंकाविरुद्धचे थेट आरोप आपल्याला पाहिला मिळणार हे नक्की.

follow us