फालतूचे सल्ले देऊ नका, फक्त गाड्या बनवण्याचं काम करा; मस्कला भिडला अजितदादा गटाचा नेता
Praful Patel on Elon Musk : निवडणुकीदरम्यान ईव्हीएमध्ये (EVM) छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला. त्यानंतर आता टेस्ला आणि स्पेस एक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) वापरू नका असा सल्ला दिला. यावरून अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)हे एलॉन मस्कला भिडले आहेत. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी फक्त गाड्या बनवण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नये, असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं.
मला खात्री, काही महिन्यात दिल्लीत वेगळा खेळ…; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान
प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एलॉन मस्कवरही टीका केली. ते म्हणाले, एलॉन मस्क यांनी फक्त गाड्या बनवण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नये. या लोकसभा निवडणुकीनंतर आपण पाहिलाय की सगळ्यांची तोंडं बंद झाली. ईव्हीएमवर कोणी काही बोलायला तयार नव्हतं. आता पुन्हा विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभं केलं. मेरे फायदे का होगा तो बडा अच्छा लगता, है मेरा नुकसान का होगा तो हमको गाली दो, अशी विरोधकांची स्थिती झाली आहे, असं पटेल म्हणाल.
BJP MLA T Raja Singh : मोठी बातमी! भाजप आमदार टी.राजा यांना अटक
पुढं बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामध्ये आम्ही सर्व जागा तर मागू शकत नाही. परंतु आमचा पक्ष आणि आमचे सहकारी असे आमचे 57 आमदार आहेत. त्या अनुषंगाने छगन भुजबळ म्हणाले तसं – 85 ते 90 जागा मागण्याचा आमचा विचार आहे, असं पटेल म्हणाले.
288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी
शिवसेना आणि काँग्रेस 288 जागांवर निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष असो, त्या पक्षाने सुरुवातीलयुती होण्यापूर्वी 288 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी ठेवावी लागते. आम्ही सुद्धा 288 जागा वर निवडणूक लढण्याची तयारी ठेवली आहे, असं पटेल म्हणाले.
एलॉन मस्क नेमकं काय म्हणाले?
एलॉन मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द केली पाहिजेत. कारण, मानव किंवा एआय हॅकिंगचा धोका अजूनही खूप जास्त आहे.