Prakash Aambedkar : ‘लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी’, असं आंबेडकर का म्हणाले?

Prakash Aambedkar : ‘लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी’, असं आंबेडकर का म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावला आहे. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांसोबत बोलूनच झाला होता, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले होते. यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी असे म्हणत त्यांनी भाजप व राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. यावेळी ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.

फडणवीस जे म्हणाले तीच भूमिका अजित पवारांनी मांडली होती. यात माझा काही दोष नाही, तो माझा पक्षाचा निर्णय होता, असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे मागे मी म्हणालेले खरे ठरले.  लग्न लावायचे गंगुशी आणि संसार करायचा सावित्रीशी, असे ते म्हणाले आहेत. तसेच बीबीसीवरील धाडी ही माध्यमांची गळचेपी असल्याची भूमिका आंबेडकरांनी मांडली.

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये पहाटेचा  अजित पवारांसोबतचा शपथविधी हा शरद पवारांशी बोलून झाला होता, असे विधान केले होते. यावर शरद पवारांनी फडणवीसांवर टीका केली होती. देवेंद्र यांना मी सभ्य व सुसंस्कृत समजतो, ते असत्याचा आधार घेऊन बोलतील असे वाटले नव्हते, अशा शब्दात पवारांनी टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube