फडणवीसांची बदनामी सहन करणार नाही, जरांगेंच्या मुद्द्यावरून दरेकरांचा शिवसेनेलाही इशारा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
Pravin Darekar : भाजपमध्येही अनेक मराठा आहेत. आपल्या मनासारखं झालं तर डोक्यावर घ्यायचं आणि नाही झालं तर कोणत्याही भाषेत बोलायचं असं जबाबदार माणसाला बेजबाबदार वागणं शोभत नाही असं म्हणतं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर भाष्य केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
त्याचबरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे जरांगेंना उत्तर देत आहेत. पण त्यामध्ये भाजप-देवेंद्र फडणवीसांची बदनामी सहन करणार नाही, महायुतीत राहून सहकाऱ्यांना शिव्या द्यायच्या हे संस्कृतीत बसत नाही, असं म्हणत दरेकरांनी शिवसेनेलाही सडेतोड उत्तर दिलं आहे.