रोहित पवारांचे शेतकऱ्यांसाठी आंदोलन म्हणजे ‘चमकोगिरी’, मंत्री विखेंची जोरदार टीका

Radhakrishna Vikhe Patil-चमकोगिरी करायच्या नावाखाली प्रत्येक बाबतीत सरकारवर टीका करायची हेच धोरण आहे.

  • Written By: Published:
Radhkrishna Vikhe Patil On Rohit Pawar

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्याला आंदोलनावर अहिल्यानगरचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी टीका केली आहे. रोहित पवारांचे आंदोलन म्हणजे चमकोगिरी असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.

रोहित पवार काय म्हणतात हे काय प्रमाण नाही. कर्जमाफीची प्रत्यक्षात 22 तारखेनंतर अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्याच्यात काही दुरुस्ती असेल तर सरकार करेल. पण चमकोगिरी करायच्या नावाखाली प्रत्येक बाबतीत सरकारवर टीका करायची हेच धोरण आहे. सगळा ठेका त्यानेच घेतलेला दिसत असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.

आसाममध्ये भारतीय वायू दलाच्या AN-32 ला अपघात; विमानाचे दोन तुकडे, 5 जवान शहीद

शरद पवार गटाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर राधाकृष्ण विखे म्हणाले, उरले-सुरले अस्तित्व संपवण्याचे त्यांनी ठरवलेली दिसते आहे. त्यांचे राजकारण आता संपल्यात जमा आहे. व त्याचा आता विचार करूनही काही उपयोग नाही. उद्या ठाकरेंच्या होणाऱ्या खासदारांच्या बैठकीला किती खासदार उपस्थित ते पाहून सगळं ठरवावं लागेल. उद्या किती जणांची लक्षणिय उपस्थिती राहती हे पाहावं लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीवर दिली आहे.


रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा, राजकारण बाजूला ठेवण्याचं सरकारला केलं आवाहन

राजकीय पोळी भाजण्यासाठी रचलेले एक नाटक : प्रा. राम शिंदे
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या आंदोलनावर सडकून टीका केली. ते म्हणाले, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. स्वतःला एक प्रबळ नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी आणि स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी रचलेले एक नाटक आहे. केवळ राजकीय कार्यकर्ते आणि काही लोकांचा मेळावा जमवून हा देखावा केला जात आहे.

follow us