ठाकरेंचे राज्यातील दौरे म्हणजे केवळ ‘नौटंकी’, मंत्री विखेंचे टीकास्त्र

  • Written By: Published:
ठाकरेंचे राज्यातील दौरे म्हणजे केवळ ‘नौटंकी’, मंत्री विखेंचे टीकास्त्र

अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्‍यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्‍यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्‍या तोंडाला त्‍यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्‍यांकडे आता फक्‍त व्‍यक्तीद्वेषाची भाषणं शिल्‍लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्‍याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्‍दव ठाकरेंनी स्वीकारला असल्‍याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज 

मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्‍या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्‍या निमित्ताने नागरीकांच्‍या भेटी घेवून त्‍यांचे प्रश्‍न जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. यावेळी विखेंना रायगडच्या दौऱ्यातून ठाकरेंकडून भाजपवर होत असलेल्या टीकेविषयी विचारले असता विखे म्‍हणाले की, यापुर्वी देखिल उध्‍दव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले. परंतू तेथील जनतेला ते काही देवू शकले नाहीत. आत्ताही ते व्‍यक्ति द्वेषाच्या भाषणांपलीकडे काहीही देवू शकणार नाहीत. कारण सत्‍ता गेल्‍याच्‍या वैफल्‍याने ते ग्रासले आहेत. त्‍यामुळे त्‍यांचे व्‍यक्ति द्वेषाची भाषा कोणालाही ऐकायला आता वेळ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

बेरोजगार तरुणांचा अंत पाहू नका, खवळले तर प्रलय येईल; संमेलनाध्यक्ष शोभणेंचा सरकारला इशारा 

ठाकरेंचे दौरे केवळ नौटंकी
विखे म्हणाले, राज्‍यातील त्‍यांचे दौरे ही फक्‍त नौटंकी असून, जनतेसाठी ठाकरे गटाकडे आता कोणताही कार्यक्रम शिल्‍लक राहीलेला नाही. जनतेलाही ते काही देवू शकणार नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी वाढलेला पक्ष उध्‍दव ठाकरे यांनी केव्‍हाच गमावलाय. त्‍यांच्‍या पक्षाचे आमदारही त्‍यांना सोडून गेले, असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.

काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडले. ममता बॅनर्जी, केजरीवाल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली. यावरही विखेंनी भाष्य केलं. देशामध्‍ये इंडिया आघाडीकडे नेतृत्‍व करायला एकही नेता आता शिल्‍लक नाही. प्रत्‍येकजण आता वेगळी भूमिका घेवून इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्‍न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्‍याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचे उरले सुरले अस्तित्‍व आता संपलेलं आहे. वेगवेगळ्या राज्‍यात इंडिया आघाडीतील नेत्‍यांमध्‍येच मतभिन्नता असल्याचं उघड झाले असल्‍याने त्‍याची काळजी आघाडीच्‍या नेत्‍यांनी करावी, असा सल्‍ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube