मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला

Rahul Bondre; राहुल गांधींशी फोनवर चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बदलला.

Rahul Bondre BJP Entry Cancelled

Rahul Bondre BJP Entry Cancelled: बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बदलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार होता. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका फोनने सगळा खेळ पलटला आणि राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेश रद्द करत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

विमाननगरमध्ये चिमुकल्यांचा जीव धोक्यात; पदपथाअभावी दोरीच्या आधाराने शाळेचा प्रवास

झालं असं की, काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली होती. त्यामुळे चिखलीसह बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात या घडामोडीने नव्या चर्चेला तोंड फुटले. राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसने आपल्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात अनेक संधी, पदे तसेच जिवाभावाची माणसे दिल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसमधील आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पक्षातील सहकाऱ्यांप्रती कृतज्ञताही व्यक्त केली. मात्र, राजकीय वाटचालीच्या नव्या टप्प्यावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. पण राहुल गांधींच्या एका फोननंतर त्यांनी आपला निर्णय बदलला.

श्वेता महाले लोकसभेसाठी; राहुल बोंद्रे चिखलीतून लढणार ? 2029 साठी भाजपचा प्लॅन ठरला

फोनवरुन काय संवाद झाला

घाबरु नका, दबावामध्ये येऊ नका, आम्हाला सर्व माहिती आहे. हे तुमच्यावर दबाव टाकत आहेत. सायकोलॉजीकली तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना हेच पाहिजे की तुम्ही पक्ष सोडावा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हारल्या शिवाय जिंकता येत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

मी आत्तापर्यंत तुमच्याकडे बघूनच लढत होतो. तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन केला. आपण कार्यकर्त्याची दाखल घेतली, आता मी पुन्हा हिमतीने लढेल. तुमचा फोन आला, आता माझं सर्व गेल तरी चालेल. मी आता तुमच्या सोबतच राहून पुर्ण ताकदीने काँग्रेसकडूनच लढणार, असे राहुल बोंद्रे म्हणाले.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळं पावसाची शक्यता; घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

दरम्यान, राहुल गांधीशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपला भाजप प्रवेश अखेर रद्द केला आणि काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

follow us