राहुल गांधी देशासाठी पर्यटक अन् पार्ट टाईम राजकारणी; बिहारच्या विजयानंतर नितेश राणेंचा खोचक टोला

Nitesh Rane यांनी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या महागठबंधन आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Letsupp Image (62)

Rahul Gandhi is a tourist and part-time politician for the country; Nitesh Rane’s sharp attack after Bihar victory : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून महायुतीला (NDA) मोठ यश मिळालं असून महागठबंधनचा सुपडासाफ झाला आहे. सुमारे 202 जांगाचं बंपर बहुमत भाजप जदयु महायुतीला मिळालं. त्यामुळे आता एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला आहे. यावरून भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी पराभूत झालेल्या महागठबंधन आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

राहुल गांधी हे देशासाठी पर्यटक आहेत. राहुल गांधी हे देशाची बदनामी करणारे पार्ट टाइम राजकारणी आहेत. अशांना भारतीय म्हणायचं का? हा प्रश्न आहे. बिहारच्या जनतेने अशा लोकांना स्पष्ट नाकारलं आहे. लोकशाहीची थट्टा करणं ही राहुल गांधींची सवय आहे. जनतेने त्यांना नाकारून NDA ला संधी दिली. लालू प्रसाद यादव यांच्या काळात कायदा-सुव्यवस्था ढासळली होती. पण नितीश कुमार आणि मोदी सरकारने महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. विविध योजना आणल्या आणि त्याचं प्रतिबिंब निकालात स्पष्ट दिसलं. असंम म्हणत राणेंनी राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे.

IPO मार्केटमध्ये आता ट्रेंड बदलतोय; आता आरामात मिळणार मल्टीप्लायर सबस्क्रिप्शन

बिहार विधानसभा (Bihar Election Result 2025) निवडणुकीत एनडीएने बहुमताने सरकार आणले. केवळ बहुमत नाही तर तब्बल दोनशेहून अधिक एनडीएला (NDA) मिळाल्या आहेत. तर भाजप हा 90 हून अधिक जागा जिंकत सर्वात मोठा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयू याला पक्षाला 80 जागा मिळताना दिसत आहे. एनडीएतील सहकारी पक्षांनी कमी जागा लढवूनही त्या जिंकून चमत्कार घडविला आहे. चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ही चांगली कामगिरी केलीय. पण उलट महाविकास आघाडी म्हणा किंवा हिंदीतील महागठबंधन म्हणा, त्यांचे पुरते पानिपत झाले आहे. बिहारमध्ये काँग्रेसला जनाधार राहिलेला नाही. तर स्थानिक पक्ष असलेल्या लालू यादव, तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला खास काही करता आलेले नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi), तेजस्वी यादव व इतर नेत्यांनी निवडणूक आयोग, सरकारवर टीका केली. परंतु जनतेने विकासाच्या मुद्द्यावर एनडीएला मतदान केल्याचे स्थानिक राजकीय विश्वेषक सांगतात.

follow us