2018 चे एबी फॉर्म शिंदे गटाला कसे चालले? नार्वेकर म्हणाले, ‘हे ठरवण्याचा मला…’
Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी काल निकाल दिला. त्यांच्या निकालामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हीच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं. शिवाय शिंदे गटाचे भरत गोगवाले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीही त्यांनी वैध ठरवली. दरम्यान, विरोधकांकडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना एबी फॉर्मवर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सही कशी चालली? असा सवाल केला जातोय. यावर आता नार्वेकरांनी स्पष्टीकरण दिलं.
नार्वेकरांनी दिल्लीहून कायदा लिहुन घेतला; आदित्य ठाकरेंची टीका
ठाकरे गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून CM एकनाथ शिंदेंचे ट्वीट रिपोस्ट करण्यात आलं. तसेच त्यासोबत जर पक्षप्रमुख पदच मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून AB form का घेतला बरं? असा सवाल विचारण्यात आला. दरम्यान एका वृत्त वाहिनीशी बोलतांना नार्वेकरांना प्रश्न याच बाबत प्रश्न विचारला. पक्ष प्रमुखांना अधिकार नाही, असं कालच्या निकालात सांगितलं. मग शिंदेंनी एबी फॉर्म भरला त्यावर ठाकरेंची सही होती, ते लीगल नाहीये का? या प्रश्नावर बोलतांना नार्वेकर म्हणाले की, योग्य प्रश्न आहे. त्यांच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे सर्वोच्च पद आहे. निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीकडे आहे. आज ही राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पक्षाची संस्था चुकीची असेल, तर एबी फॉर्म दिला तेव्हा चूक नव्हती का? हा तुमचा प्रश्न आहे. एबी फॉर्म चुकीचा दिले की, बरोबर दिले हे ठरवण्याचा मला अधिकार नाही. पण त्या पक्षाच्या घटनेनुसार इतर निर्णय घेतले जातात की नाही हे पाहण्याचा अधिकार मला आहे, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, एकाक्षणी चूक झाली म्हणून ती चुक आता सुरू ठेवायला द्यायची हा तर्क मला पटणारा नाहीये. वन रॉंग कॅननॉट जस्टिफाय द अदर… माझ्यासमोर जी चूक निर्णयाला आली ती मी रेक्टिफाय करणार. जे पूर्वी चुकीचं झालं असेल त्याबद्दल कुणाला दाद मागायची असेल तर त्यांनी कोर्टात, निवडणूक आयोगाकडं जावं, असं नार्वेकर म्हणाले.