जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला

Raj Thackeray on IIT Bombay Sahil Wakode case राज ठाकरेंनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका तसेच विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. 

Raj Thackeray On IIT Bombay Sahil Wakode Case

Raj Thackeray criticizes the ruling party and advises students on IIT Bombay Sahil Wakode case : मुंबईतील आयआयटी बॉम्बेमध्ये 22 वर्षीय विद्यार्थी साहिल रविंद्र वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणामध्ये एका मागे एक प्रकरणाला वळण देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. त्यात आता राज ठाकरेंनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाला जातीय वळण दिले आत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केली. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना यात न पडता फक्त समस्यांसाठी लढा देण्याचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.

फटाके-डीजेच्या दणदणाटाला उच्च न्यायालयाचा दणका; विद्यानंद बापट म्हणाले, ‘सर्व वाद्यांवर बंदी हवी’

एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता ‘जात’ हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये.

महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर

मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसऱ्यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.

बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशनचा प्रभाव; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पावसाचा इशारा

मुळात आयआयटी असो की त्याच्या आधीच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असोत या जीवघेण्या होत चालल्या आहेत. काही शे सीट्ससाठी लाखो विद्यार्थी बसतात, त्यातून निवड झाली की अभ्यासाचं ओझं, मग कॅम्पस सिलेक्शनमध्ये काय होईल याचा ताण. त्यात आयआयटी असो की आयआयएम असो पूर्वीसारखे कॅम्पस निवडीत उत्तम पगार मिळत नाही. बरं हे नैराश्य फक्त आयआयटी विद्यार्थ्यांनाच आहे असं नाही तर ते सर्वत्र आहे. अगदी कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांपासून ते डॉक्टर्स, इंजिनिअर्सपर्यंत सगळ्यांना याचा ताण आहे. या नैराश्यातून साहिलने आत्महत्या केली. त्यामुळे या एकूणच पूर्णपणे मोडकळीस आलेल्या शिक्षण व्यवस्थेला प्रश्न विचारून ते बदलायचं? का आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची आणि त्याला जाब विचारणाऱ्याची जात काढत बसायची.

आजचं राशिभविष्य: कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला घ्यावी लागणार काळजी?

प्रश्न हे सरकार का ते सरकार नाहीच आहे. गेल्या ३०,४० वर्षांत शिक्षणाचं बाजारीकरण करण्याच्या नादात आपण पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेचं अपरिमित नुकसान केलं आहे. त्यात आमूलाग्र बदल आणले पाहिजेत. याची सुरुवात नुकत्याच झालेल्या जेन झी आंदोलनातून होत आहे असं वाटत असताना हा प्रकार पुढे आला. माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुमच्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला कारण तुमचा मुद्दा हा व्यवस्थेतील दोषांवर उपाय हवा यासाठी होता. तुमचं आंदोलन हे याच मार्गाने पुढे चालू राहायला हवं. कारण तसं राहिलं तर सरकारला अनेक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील, काही कृती पण करावी लागेल. आणि सरकारला हे करायचं आहे का ? असेल तर आनंदच आहे आणि नसेल तर जात धर्म ही अमोघ अस्त्र त्यांच्याकडे आहेतच. एकदा जात धर्म आणला की विषय भरकटवायला सोपा होतो. असल्या भानगडीत कोणीच पडू नका.

करार करा नाहीतर कठोर कारवाईला सामोरं जा; इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी कौन्सिलिंगची व्यवस्था, चोवीस तास सायकिऍट्रिस्टची उपलब्धता, तक्रार केली तर ती खरंच सोडवली जात आहे यातली पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांनी शिस्त मोडली तर त्याच्यावर कारवाई करताना तो खचणार नाही अशी व्यवस्था या मागण्या केल्या आहेत. त्यांच्या आंदोलनाची खरी दिशा हीच असली पाहिजे. शिक्षणव्यवस्थेतील दोष दुरुस्त करण्यासाठीच हे आंदोलन पुढे गेलं, तर सरकार आणि प्रशासनाला त्यावर उत्तरं द्यावी लागतील आणि कृतीही करावी लागेल.

साबण-शॅम्पू व्हेज की नॉनव्हेज? आता पॅकेटवरील रंगीत ठिपका सांगणार

सत्तेचं राजकारण करण्यात स्वारस्य असणाऱ्यांना जात हा विषय आवडीचा असतो, विद्यार्थ्यांनी त्यात अडकू नये, उलट असल्या राजकारण्यांना त्यांची लायकी दाखवावी. आपल्या सरकारी यंत्रणेतील दोषांवर कोणीही बोलू अथवा आंदोलनं करू नये ( कारण पुन्हा केंद्रीय शिक्षण खात यात अडकत , ज्या खात्याच्या मंत्र्याचा आत्ताच राजीनामा मागण्याचं आंदोलन झालं ) म्हणून जात धर्माचं शस्त्र वापरून त्यात तुम्हाला अडकवून मूळ विषया पासून तुमचं लक्ष भरकटवायचं हेच सध्या सुरू आहे असं दिसतंय. आयआयटीच काय किंवा कुठल्याही कॅम्पसवरती हे मुद्दे होऊन तुमच्यात मनभेद होतील आणि फूट पडेल असं काही करू नका. साहिल वाकोडे याचा मृत्यू दुर्दैवी आहे. जे घडलं ते या शिक्षण व्यवस्थेतील आपणच निर्माण केलेल्या दोषांमुळे घडलं. यावर काम करणं हीच साहिल वाकोडे आणि त्याच्यासारख्या अनेकांनी ज्यांनी ताण सहन न होऊन स्वतःचा जीव दिला आहे त्यांना श्रद्धांजली ठरेल.

follow us