राज ठाकरे यांनी मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्या; निलेश राणेंकडून वर्मी घाव

Raj Thackeray यांनी मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा निवडणूक आयोगाला दिला. त्यावरून राणे यांनी टीका केली.

Nitesh Rane

Raj Thackeray should go Mohalla and check the voter lists;Nitesh Rane lashes out : राज्यात लवकरत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर होणार आहे. यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोग तयारी देखील करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही. तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यावरून आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंच्या वर्मी घाव लागेल अशी टीका केली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

राज ठाकरेंची काल सभा झाली. ते अभ्यासू नेते आहेत आणि मुद्देसूद बोलतात. अशा सभा आणि वोट वोट चोरीचे आरोप लोकसभेनंतर का झाले नाहीत? कारण ते उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत. चुकीची माहिती राज ठाकरेंना दिलेली आहे. आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे. तुम्ही मालेगाव आणि बहरमपाडा, नळ बाजारमध्ये कधी जाणार? अबू आझमीच्या कानाखाली का खेचली नाही? मानखुर्द शिवाजीनगरमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढण्याचे काम आमच्या सरकारने केलेल आहे. राज ठाकरेंकडून मविआच्या नादाला लागून भाजपला टार्गेट केलं जातं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना सासऱ्याने मारले, औरंगजेब उगाच बदनाम; बच्चू कडूंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

हेच जर लोकसभेवेळी विचारलं असतं तर. त्यामुळे राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये. ते वाया गेलेले मतदार आहेत. उद्या हाजीअलीला जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? वातावरण कोण खराब करतयं? नमाज पडण्यासाठी यांना मशिदि कमी पडत आहे. मोर्चे मोहल्यावर काढा आधी. त्यामुळे खरचं बोगस मतदार जाणून घ्यायचे असतील तर सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासा असा वर्मी लागणारा सल्ला देखील राणे यांनी यावेळी राज यांना दिला.

‘कलाकारांना 9 ते 5 नोकरीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते’… काजोलचा दावा; सोशल मीडियावर वाद

दरम्यान राज ठाकरे रविवारी मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित मनसेच्या मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, माझ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझी विनंती हे की सतर्क राहा. मी आज सर्व यादी प्रमुखांना बोलवलं आहे. सर्व गोष्टी टप्प्या- टप्प्याने होणार आहे. तुम्ही घरा-घरांमध्ये जा आणि याद्या तपासा. आमचे लोक जेव्हा येतील किंवा सहकारी पक्षाचे लोक जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा नागरिकांना सहकार्य करा. एकएका घरांमध्ये आठशे- आठशे लोक भरले जात आहेत. सातशे माणसं, एक हजार माणसं, जे मतदार नाहीत पण अशी सर्व खोटो मतदार भरुन हे निवडणुकांना समोरं जायचं म्हणत आहेत. पण जोपर्यंत ही निवडणूक यादी स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा असं या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले.

follow us