Video : उज्वला थिटेंना अजित पवारांचाच पाठिंबा! अन्यथा, राजन पाटील नक्की काय म्हणाले?
उज्वला थिटे यांना या तालुक्याचं आमदार व्हायचं आहे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे.
उज्वला थिटे यांना अडवलं, पोलीस त्यांच्या घराजवळ पाठवलं किंवा त्यांना फॉर्म भरून दिला गेला नाही, असं चित्र जे काही माध्यमांसमोर दाखवलं गेल ते खोट आहे. (Rajan Patil) तसं आम्ही काहीच केलं नाही असं म्हणत, उज्वला थिटे यांनी केलेले सर्व आरोप माजी आमदार राजन पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. लेट्सअप मराठीवर संपादक योगेश कुटे यांनी घेतलेल्या मुलाखतीत राजन पाटील बोलत होते.
बिनविरोध निवडणूक का? या प्रश्नावर बोलताना, गावात गोंधळ होऊ नये, गुंडागर्दी होऊन नये, कायदा सुव्यवस्था बिघडू नये यामुळे आम्ही बिनविरोध निवडणूक घेतो आसा प्रतिवाद राजन पाटलांनी केला. तसंच, तुम्ही तुमच्या सून नगर परिषदेला उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध केली का? यावर बोलताना ती उच्च शिक्षीत असल्याने ती लोकांनी निवडली असा दावा त्यांनी केला.
Video : मी जर तिसरा डोळा उघडला तर.., उज्वला थिटेंनी राजन पाटलांचा इतिहासच सांगितला
उज्वला थिटे यांना या तालुक्याचं आमदार व्हायचं आहे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे असा थेट आरोप पाटील यांनी केला आहे. तसंच, आजपर्यंत या माझ्या अनेकदा पाया पडल्या आहेत, उमेदवारी मागायला आल्या आहेत तेव्हा त्यांना मी गुंड वाटलो नाही का? असा थेट वार राजन पाटील यांनी केला आहे. त्याचवेळी दुसरी महिला फॉर्म भरत असेल तर तुम्हाला काय वाईट वाटत, यावर पाटील म्हणाले त्यांनी आमच्याकडं इच्छा व्यक्त केली असती तर त्यांचा विचार केला असता असंही ते म्हणाले.
सध्या तालुक्यात जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना साधा कोतवाल सुद्धा बोलत नाही. मग हे प्रशासन हालवल कुणी? उज्वला थिटे यांचं नाव न घेता त्यांना ताकद कुणी दिली असा प्रश्न उपस्थित करत राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाना साधला. उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवारांनी गावच्या ग्रामपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांत लक्ष घालणं कितपत योग्य आहे असंही राजन पाटील म्हणाले आहेत.
तुम्हाला लग्नात सोन्याच्या अंगठ्या घालाव्या लागतात असा उज्वला थिटे यांचा आरोप आहे असं विचारल्यावर त्यांनी त्यांच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेऊन सांगाव की मी अगठ्या घेतो असा प्रतिसवाल केला आहे. तसंच, सर्वात कमी खर्चात विधानसभेची निवडणूक होणारा माझा मतदारसंघ आहे असा दावाही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर मी आजही गाडीवर फिरतो. लोकांमध्ये जातो, असं काही असतं तर लोकांनी मला सहकार्य केलं असतं का? असंही ते म्हणाले आहेत.
