राज्यसभा उमेदवाराचा पेच सुटला ? छगन भुजबळ हेच उमेदवार राहणार, तटकरे यांचे संकेत

Rajya Sabha Election 2026-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव अंतिम झाल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे.

  • Written By: Published:
Chhagan Bhujbal

Rajya Sabha Election 2026: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. या जागेवर निवडणूक जाहीर झाली असून, या जागेसाठी सोमवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव अंतिम झाल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिले आहे. भुजबळांच्या नावासाठी सर्वजण आग्रही असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.


वरळीतील Music कॉन्सर्टमध्ये 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू; ड्रग्ज नव्हे धक्कादायक कारण समोर

माजी खासदार नवनीत राणा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेट घेतली. त्याचा फोटोही त्यांनी फेसबुकवर टाकला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचे नाव जाहीर होईल, असे बोलले जात होते. परंतु तटकरे यांनी राणा या उमेदवार नसतील, असे जाहीर केले आहे. राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्याबाबत कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी सुरू आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी उद्या सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे.


मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही; फडणवीस किंवा महाजनांकडून कोणतीही सूचना?


रात्रीच उमेदवारीचा निर्णय होणार…

कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्य सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, समीर भुजबळ यांच्यासह बैठकीला दिग्गज नेतेमंडळी हजर आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तीन वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे कोअर कमिटीच्या या बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत सुनेत्रा पवार उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. परंतु राष्ट्रवादीमधील नेतेही छगन भुजबळ यांच्या नावासाठी आग्रही असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तेच उमेदवार असू शकतात.


भुजबळांच्या अटी मान्य होणार ?

छगन भुजबळ हे दिल्लीला गेल्यावर येवला विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होणार आहे. या रिक्त जागेवर पुतण्या समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी व माझे मंत्रिपद त्यांना द्यावी, अशी भूमिका छगन भुजबळ यांची आहे. समीर भुजबळ यांना आमदारकी मिळू शकते. परंतु मंत्रिपद मिळण्याबाबत शंका आहे.
भुजबळांबरोबर तडतोड न झाल्यास समीर भुजबळांना दिल्लीला पाठविले जाऊ शकते. दोन्ही तडजोड न झाल्यास उमेश पाटील, अविनाश आदिक, वैशाली नागवडे यांच्यापैकी एकाचा नाव फायनल केले जाऊ शकते.

follow us