राऊतांना रश्मी वहिनींनी दिला होता प्रसाद; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

  • Written By: Published:
राऊतांना रश्मी वहिनींनी दिला होता प्रसाद; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट

मुंबई : पहाटेच्या शपथविधीवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवारांच्या (Sharad Pawara) चर्चेनंतरच पहाटेचा शपथविधी झाला असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यावर फडणवीस हे सुसंस्कृत नेते असून त्यांनी असं करायला नको असं सांगत पवारांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस खोटे बोलत असल्याचं सांगितले. दरम्यान, आता फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी म्हणजेच रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) संजय राऊतांना प्रसाद दिला होता असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

पहाटेच्या शपथ विधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना देखील होती याबाबत ठाकरे कुटुंबातील कोणाला कळाले होते का? या प्रश्नावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीच्या रणनीतीत राऊतही होते हे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे सगळ्यांना माहिती पडले.

याबाबत उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांना माहिती होती. परंतु परिस्थितीमुळे काहीही बोलता आले नव्हते. मात्र त्यावेळी जे काही घडलं ते सर्व काही आता सांगू शकत नाही, पण संजय राऊत यांना चांगलाच प्रसाद दिला होता आणि तो प्रसाद संजय राऊत यांना चांगला माहित आहे. आता पश्चाताप करण्याची वेळ गेली असून, तेही पुढे गेले आणि आम्ही देखील पुढे गेलो असल्याचं संजय शिरसाट म्हणाले.

Uddhav Thackeray ची ‘ती’ एक चूक; शिवसेना नावासह चिन्ह गमावले

तर पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, रश्मी वहिनींनी संजय राऊतांना प्रसाद दिला यावर आता नंतर भाष्य करू, परंतु याबाबत अख्ख्या मातोश्रीला माहित आहे. ऑपरेटरपासून तर सर्व पीए आणि किचनमध्ये काम करणाऱ्यांपर्यंत सर्वांना माहित आहे. पण यावर आता भाष्य करणे उचित नाही. मात्र एवढ नक्की आहे की, ज्यांच्यावर विश्वास नको पाहिजे होता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवला असल्याचं शिरसाट म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube