Sharad Pawar : विरोधकांमुळे अस्वस्थता वाढल्याने मोदी व्यक्तिगत हल्ले करत आहेत; पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar : विरोधकांमुळे अस्वस्थता वाढल्याने मोदी व्यक्तिगत हल्ले करत आहेत; पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar PM Modi : ‘भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत. तसेच पाटण्याला देशातील 16 राजकीय पक्षांची बैठक झाली. त्या बैठकीची माहिती कळाल्यानंतर त्यांची अस्वस्थता वाढली. त्यामुळे त्यांनी असे व्यक्तीगत हल्ले करायला सुरू केले आहे. तसेच ते या बैठकीला फोटोजनिक सेसन असं ही म्हणाले, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते त्यावेळी त्यांनी ही टीका केली. ( Restlessness PM Modi attack individually due to opposition meeting )

Sharad Pawar: …म्हणून काही खेळी खेळल्या; डबल गेमच्या आरोपांवर पवारांचा पलटवार

आगामी काळात लोकसभेच्या आणि काही राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर भाजपला जनमताचा पाठिंबा किती आहे. हे पाहणं गरजेच आहे. त्यामध्ये आता अनेक राज्य भाजपच्या हातात नाहीत. काही ठिकाणी युती करत किंवा पक्ष फोडत भाजपने सरकार स्थापन केली आहे. तर मणिपूर या भाजपच्या राज्यात कायदा आणि सुव्यस्था बिघडली आहे. या सर्व राज्यांचं चित्र हेच सांगत की, भाजप हे राज्य सांभाळू शकलेलं नाही.

शीख, ख्रिश्चन, जैन समाजाबाबत भूमिका स्पष्ट करा, समान नागरी कायद्यावर शरद पवारांनी ठेवलं बोट…

त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये काय होईल याची खात्री नसल्याने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाला अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत. ते राष्ट्रवादीवर टीका करताना म्हणाले की, मुलीला प्रोत्साहन द्यायचे असेल तर राष्ट्रवादीला मतदान करा. आम्ही मात्र त्यांच्या्वर वैयक्तिक टीका करत नाही. कारण ते एक व्यक्ती नाही तर संस्था आहेत.

तसेच यावेळी पवारांनी विरोधकांच्या आगामी बैठकीबाबत माहिती दिली ते म्हणाले आता आम्ही बेंगलोरमध्ये दुसरी बैठक घेणार आहोत. 13 आणि 14 जुलैला ही बैठक असेल . त्यामध्ये पुढची निती, निवडणुकीला सामोर कसं जायचं? राज्या राज्यांमध्ये सांप्रदायिक चित्र निर्माण केलं आहे. त्याला सामोरे कसं जायचं हे ठरवलं जाणार आहोत. असं शरद पवारांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube