ठाकरेंना रोखणारा अजून जन्माला यायचाय, राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T111910.124

Sanjay Raut Attack On Narayan Rane : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आंदोलकांशी भेट घेणार आहेत. या अगोदर नारायण राणे व संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे. यावर आता राऊतांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

उद्व ठाकरे हे थोड्याच वेळात बारसू येथे उतरतील. येऊन देणार नाही म्हणजे काय. अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांना गृहमंत्र्यांनी जेलमध्ये टाकायला हवे, असे ते म्हणाले आहेत. येऊन देणार नाही, म्हणजे काय. शिवसेना व कोकणचे एक नाते आहे. ठाकरे परिवाराचे व कोकणचे एक नाते आहे. कोकणवर जेव्हा- जेव्हा हल्ला झाला तेव्हा शिवसेना कोकणी माणसाच्या पाठीमागे उभी राहिली आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

Udhav Thackeray बारसूमध्ये दाखल, ग्रामस्थांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेणार

शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत आहे. भांडवलदारांचे दलाल धमक्या देत आहेत. आता उद्धव ठाकरे बारसूत उतरतील. काय येऊ देणार नाही. या पोकळ धमक्या देणं बंद करा. या देशात लोकशाही आहे. राज्यात लोकशाही आहे. आंदोलक जमिनी वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

कुणाच्या जमिनी हिसकावून घेत नाही. माझी जमीन वाचवण्याचा मला अधिकार आहे. जमीन माझी आहे. आम्ही चोर नाही. दहशतवादी नाही. दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका. आम्ही आमच्या जमिनी वाचवू. त्यासाठी आंदोलन करु, असा इशाराच राऊत यांनी दिला. शिवसेनेला रोखणारा अजून जन्माला आला नाही. आम्हाला कोणी रोखू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी राणेंना खडसावले आहे.

Tags

follow us