माझ्यावर खापर फोडू नका, मी फक्त शरद पवारांचं ऐकतो; राऊतांचे अजितदादांना प्रत्युत्तर
Sanjay Raut On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र यावर खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच माझ्याविषयी सारख्या अफवा पसरवल्या जात आहे. मी राष्ट्रवादीमध्ये राहणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांवर देखील नाव न घेता टीका केली आहे. यावर आता संजय राऊतांनी देखील अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ज्या पक्षाचं मुखपत्र आहे त्याबद्दल… विधानभवनातून अजित पवारांचा राऊतांवर रोख…
अजितदादा माझ्या विश्वसनियतेवर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. शरद पवार माझ्यावर प्रश्न उपस्थित करु शकतात. मी फक्त शरद पवारांचे ऐकणार, असे म्हणत संजय राऊतांनी अजितदादांना जोरदार उत्तर दिले आहे. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्वाची आहे. मी काहीही चुकीचे लिहिलेले नाही. जे आमचं धारदार सत्य आहे ते जर कुणाला टोचत असेल तर मी त्याला काय करु, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
तसेच माझ्यावर खापर फोडण्याचे काय कारण आहे. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. महाविकास आघाडीचा घटक मजबूत रहावा हे माझे कर्तव्य आहे. ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही देखील आमची वकिली करत होतात, असेही राऊत म्हणाले आहेत.
Karnataka Election : राजकीय गणितं बदलणार?; माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये दाखल
दरम्यान, अजित पवारांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला होता. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं बोलतात. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी खंबीर आहोत. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. दरम्यान आमची भूमिका मांडण्यासाठी आमच्या पक्षाचा प्रवक्ते, नेते मजबूत असल्याचंही त्यांनी राऊतांना उद्देशून कडक शब्दात सांगितले होते. त्याला आता राऊतांनी उत्तर दिले आहे. यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये धुसफूस दिसून येते आहे.