भारत आणि अमेरिकेत काय सौदा झाला?, संजय राऊतांचा थेट सवाल

भारत आणि अमेरिकेत काय सौदा झाला?, संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) शस्त्रसंधी झाली. यावर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध परिस्थितीमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप हा मोठा सौदा असल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला.

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान; पाकिस्तानला फोडला पुरता घाम 

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की,आपण पाकिस्तानसमोर झुकलो नाही, तर अमेरिकेसमोर झुकलो. डोनाल्ड ट्रम्प यांना आपण सरपंच म्हणून नेमलेलं नाही. त्यांना फौजदारकी करायचा अधिकार पंतप्रधान मोदींनी कसा काय दिला. ट्रम्प दररोज भारत, पाकिस्तान आणि काश्मीरविषयी सूचना करत आहे. त्यांनी आधी शस्त्रविराम केला, आपण ऐकलं. ते आता म्हणत आहेत की, मी काश्मिर प्रश्न सोडवता.

ट्रम्प यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही
राऊत पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी शिमला करार वाचला पाहिजे. त्याआधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिमला करार वाचला पाहिजे. हा द्विराष्ट्र करार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही तिसरं राष्ट्र हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामध्ये ट्रम्प आले कुठून? काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यामध्ये ट्रम्प असो की, पुतिन यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

ब्रेकिंग : 14 वर्षांचा ‘विराट’ प्रवास थांबला! ‘अँग्री यंग मॅन’ कोहलीचा कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’ 

ट्रम्प त्यांच्या गावचे पाटील
जर आमचं लष्कर समर्थ आहे, असं म्हणत आहोत. तर त्यात ट्रम्प यांनी लक्ष देण्याची गरज नाही. किंवा सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची गरज नाही. ते त्यांच्या गावचे पाटील आणि आम्ही आमच्या गावचे पाटील. पण, नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या अनिर्णयशील भूमिकेमुळे, डोनाल्ड ट्रम्प यामध्ये घुसले आहेत.

भारत आणि अमेरिका यांच्यात काय सौदा झाला?
राऊत म्हणाले, अमेरिकेचे प्रेसिडेंट भारतामध्ये गुसले हे भारताचे खूप मोठे दुर्दैव आहे. त्यामुळं हा काय सौदा झाला? हे भविष्यात कळेलच. अमेरिकेत असलेले कोणावरचे खटले काढून घेतले जात आहे? अजून कोणाला काय मिळत आहे? हे देखील भविष्यात कळेल. अमेरिकेत काही उद्योगपतींना काम-धाम मिळत आहे का? हे देखील पाहावं लागेल. विशेषत: अमेरिकेमध्ये काही उद्योजकांवर लाचखोरीचे खटले चालू आहेत, त्यामुळं भारतातील काही लाडक्या उद्योगपतींना अमेरिकेत अटक होण्याची भीती वाटते. या सर्व गोष्टी भविष्यात कळतीलच. भारत आणि अमेरिका यांच्यात काय सौदा झाला? हे समजणे या देशाला गरजेच आहे, असं राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube