शंभूराज देसाई झेडपीतील मानहानीचा वचपा विधान परिषदेत काढणार ?

Satara-Sangli MLC-कोणत्या गटाकडून कोण इच्छुक आहेत. दोन्ही जिल्ह्यात कोणाचे किती मतदार आहेत ? सातारा झेडपी निवडणुकीच्या वादाचा येथे फटका बसेल का ?

  • Written By: Published:
Satara Sangli Mlc

Satara-Sangli MLC: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) निवडणूक जाहीर झालीय. त्यानंतर इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावलीय. काही ठिकाणी उमेदवारी निवडण्यापासून ते निवडून आणणाऱ्यापर्यंत पक्षांची कसरत लागणार आहे. अनेक जिल्ह्यात काँटे की टक्कर असणार आहे. अशीच परिस्थिती सातारा-सांगलीमध्ये (Satara-Sangli MLC) असणार आहे. कारण खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आपल्या गटातील इच्छुकांसाठी प्रयत्न सुरू केले आहे. कोणत्या गटाकडून कोण इच्छुक आहेत. दोन्ही जिल्ह्यात कोणाचे किती मतदार आहेत ? सातारा झेडपी निवडणुकीच्या वादाचा येथे फटका बसेल का ? राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची काय भूमिका असेल हेच जाणून घेऊया…

सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकलाय. भाजपकडे इच्छुकांची मोठी यादीच आहे. त्यामुळे उमेदवार निवडीसाठी पक्षातील नेत्यांचा कस लागणार आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या माणसासाठी फिल्डिंग लावलीय. त्यातून दोघांनीही थेट मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलीय. तसेच उमेदवारांबाबत चर्चा केलीय. दोन्ही गटाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा दावा केला जातोय.

शेअर बाजारासारखं आता पावसावर होणार ट्रेडिंग; मुंबईतील पावसावर लागणार पैसा वाचा, काय होणार?


भाजपकडून कोण-कोण इच्छुक ?

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले निकटवर्तीय सुनील काटकर यांचे नाव पुढे केलंय. काटकर हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती आहेत. तर मंत्री गोरे यांनी साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी द्यावी, अशी गळ फडणवीसांना घातलीय. तर सांगली जिल्ह्यातून समित कदम, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख हे प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय शेखर इनादार आणि भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संगठन मंत्री मकरंद देशपांडे यांचंही नाव चर्चेत आहे. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. परंतु आता तशी परिस्थिती नाही. त्यात उमेदवारा सातारा की सांगली जिल्ह्यातून द्यायचा यावर पक्षांमध्ये खल होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे मुलगा प्रतिक पाटीलसाठी इच्छुक असल्याची राजकीय चर्चा आहे.


पुणे रेल्वे स्टेशनजवळ वन्यजीव तस्करीचा मोठा पर्दाफाश; शेकरू आणि स्टार कासवांसह दोघे ताब्यात


कोणाकडे किती मतदार ?

सातारा आणि सांगली मतदारसंघांमध्ये जवळपास 853 इतके मतदार आहेत. त्यात साताऱ्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 139 मते आहेत. तर शिवसेनेकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 55, काँग्रेसकडे 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1 आणि स्थानिक आघाडीकडे 46 मते आहे. महायुतीकडे सर्वाधिक मते महायुतीकडे आहेत. तर दुसरीकडे सांगलीमध्ये भाजपकडे 93, शिवसेनेकडे 44, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 65, काँग्रेसकडे 52, राष्ट्रवादी शरद पवारकडे 84 आणि ठाकरेंकडे एक मत आहे. सांगलीमध्ये महायुतीकडे संख्याबळ आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंना अटक


झेडपीचा वादाचा शंभुराज देसाई उट्टे काढणार?

तीन महिन्यांपूर्वी सातारा झेडपीचे अध्यक्षपदाची निवडणूक राज्यभरात गाजली होती. भाजपचे सर्वाधिक 27 जागा असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने भाजपला दूर ठेवायचे ठरविले होते. राष्ट्रवादी-शिंदे गट एकत्र आला होता. परंतु मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचे दोन सदस्य फुटले होते. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष झाला होता. त्यावेळी पोलिस आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये वाद झाला होता. तो वाद थेट विधानपरिषदेत गाजला होता. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. दोघांकडून एकत्रित उमेदवार दिला आणि महाविकास आघाडीकडून छुपा पाठिंबा घेतल्यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना अशी महायुतीमध्ये लढत होऊ शकते. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास भाजपमध्ये तगडे आव्हान निर्माण केले जाऊ शकते हे नक्की.

follow us