Sharad Pawar : भुजबळ म्हणाले काय सुरु आहे पाहतो, ते थेट शपथ घेताना दिसले

  • Written By: Published:
Sharad Pawar : भुजबळ म्हणाले काय सुरु आहे पाहतो, ते थेट शपथ घेताना दिसले

राज्यात आज सकाळपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनंतर राज्याच्या राजकारणा महाभूकंप घडला आहे. अजित पवारांनी आपल्या 9 सहकाऱ्यांनासोबत राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे छगन भुजबळ यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. यावर बोलताना शरद पवार म्हणाले भुजबळ मला म्हणाले की हे काय सुरु आहे मी जाऊन बघतो तुम्हाला कळवतो. ते थेट शपथ घेताना दिसले. (Sharad Pawar: Bhujbal said he is watching what is going on, he was seen swearing directly)

पुढे बोलताना पवार म्हणतात , राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून माझी त्यांच्याविरोधातच भूमिका आहे. 6 तारखेला होणाऱ्या बैठकीत पक्षाची संघटनात्मक चर्चा होणार होती. त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार होती. मात्र, त्याआधीच सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली आहे.

अजित पवारांसोबतचे काही सदस्य माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी माझ्याकडे त्यांची भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांसोबतच्या सहकाऱ्यांची भूमिका दोन ते तीन दिवसांत समोर येणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. सध्या जो प्रकार घडला आहे, तो मला काही नवीन नाही.

Raj Thackeray : पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !

याआधीही असा प्रकार 1980 मध्ये घडला होता. त्यावेळीही 58 आमदारांपैकी 52 आमदार सोडून गेले होते. त्यावेळी विरोधी पक्षनेता होता.उर्वरित 6 जणांना सोबत घेऊन मी पक्ष पुढे चालवला, माझा मतदारांवर विश्वास असून पुन्हा जोमाने उभा राहणार असल्याचं शरद पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.

दरम्यान, अजित पवार पक्षात नाराज असलेल्या चर्चांना काही दिवसांपासून सुरु होत्या. त्यानंतर अजित पवारांनी आपल्याला संघटनेत काम करण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं होतं. मात्र, त्यांनतर शरद पवारांनी भाकरी फिरवत प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केलं होतं. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी अजित पवार, छगन भुजबळ यांचे नाव समोर येत होते. परंतु ह्याच नेत्यांनी पक्षात उभीफूट पाडली आणि आपल्या 40 सहकारी आमदारासोबत भाजपचा हात धरला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube