मुंडेंना चीतपट करण्यासाठी पवारांचा डाव; आमदार गुट्टेंच्या जावयाने तुतारी फुंकली
Sharad Pawar News : लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीलाही लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता महायुतीला सुरुंग लावण्याची तयारी केल्याचंच दिसून येत आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar gutte) यांचे जावई राजाभाऊ फड (Rajabhau Fad) यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलायं. यावेळी बोलताना परळीतून फड हेच उमेदवार राहणार असल्याची चर्चा रंगली होती, तसे संकेतही शरद पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत.
फाशीची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्याची पद्धत; वडेट्टीवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना घेरलं
परळी हा मंत्री धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राजाभाऊ फड यांचा दांडगा जनसंपर्क आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत फड यांना उमेदवारी दिल्यास धनंजय मुंडे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहू शकतं, त्यामुळे शरद पवार यांनी डाव टाकत पक्षप्रवेशावेळी परळीतून उमेदवार राहणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेतही दिले आहेत.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो, सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते, जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातोयं, पंतप्रधान 400 पार निवडून येणार सांगत होते, पण किती खासदार आले, राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहेत. आमच्या नावावर निवडून आले मग भाजपसोबत सत्तेत जाऊन बसलेत, या शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.
व्हिडिओला लाईक केलं तरी चौकशी होणार; पुणे पोलिसांचा घाम फोडणारा आदेश नेमका काय?
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर सभांमधून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता ही फक्त सुरुवात आहे, आम्ही परळीत मोठी सभा घेऊन दाखवून देणार आहोत, राज्यातलं सरकार आम्ही बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, फक्त दोनच महिने राहिलेत, या शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता निशाणा साधलायं.