‘शरद पवार भाजपसोबत येण्यास तयार होते’, पटेलांच्या दाव्यावर पवार काय म्हणाले?

‘शरद पवार भाजपसोबत येण्यास तयार होते’, पटेलांच्या दाव्यावर पवार काय म्हणाले?

Sharad Pawar on Praful Patel : लोकसभा निवडणुकीच रणधुमाळी सुरू आहे. अशातच काल प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार 50 टक्के भाजपबरोबर येण्यास अनुकूल होते, असा दावा पटेल यांनी केला होता. त्यावर आता खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं.

अमोल कोल्हेंचा विजय सुकर; शिरुरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली! 

आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केल. यावेळी पत्रकारांनी धैर्यशील मोहितेंच्या पक्ष प्रवेशाविषयी विचारलं असता पवार म्हणाले की, येत्या १६ तारखेला धैर्यशील मोहिते पाटील आमच्या पक्षात प्रवेश करतील. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करतील, असं पवार म्हणाले.

मोठी बातमी! माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांविरुद्ध धैर्यशील मोहितेंची लढत? पवारांकडून पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब 

प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्याविषयी विचारताच पवार म्हणाले, मी भाजपसोबत गेलो किंवा जायलं हवं होतं असं ते म्हणतात. पण गेलोय का? नाही. आज कोण गेलं आणि कोण राहिलंय हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी जे विधान केलं, त्यानंतर आजपर्यंत काय वस्तुस्थिती दिसते. मी भाजपबरोबर जायला पाठिंबा दिला, असं ते म्हणाले, पण भाजपमध्ये कोणं गेलं? असा सवाल पवारांनी केला.

एचडी देवेगौडा 1996 मध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवण्याच्या तयारीत होते. मात्र, शरद पवार यांनी ऐनवेळी कच खाल्ली, अशी टीका पटेलांनी केली होती. यावर बोलतांना पवार म्हणाले की, 1996 ची गोष्ट वेगळी होती. देवेगौडांनी काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिलं होतं. त्यावेळी ते मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी देवेगौडा यांच्यासोबत गेलो नाही, असे शरद पवार म्हणाले.

पटेल काय म्हणाले?
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 2 जुलै 2023 रोजी अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले. यानंतर त्यांनी काका शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्षातील सर्वच बड्या नेत्यांनी पवार यांना नेतृत्व स्वीकारण्यासोबतच एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केलं होते, त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्यासाठी अर्धे मनाची तयारी केली होती. परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. शरद पवार शेवटच्या क्षणी मोठे निर्णय घेऊ शकत नाहीत. 1996 मध्येही सीताराम केसरी यांच्यावर नाराज असलेल्या काँग्रेस खासदारांनीही शरद पवारांना नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले होते, त्यावेळीही त्यांना ते मान्य नव्हतं आणि शरद पवार पंतप्रधान होण्यापासून मुकले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube