Sharad Pawar : शिंदे गटाला शरद पवारांचा धक्का! बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Sharad Pawar : निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसा फोडफोडीच्या राजकारणाने (Maharashtra Politics) वेग घेतला आहे. आतापर्यंत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटालाच गळती लागल्याचे दिसत होता. आता मात्र राजकारण फिरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोडून गेलेले काही नेते पुन्हा घरवापसी करू लागले आहेत. तसेच शिंदे गटालाही हादरे बसू लागले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी खेळी करत शिंदे गटाचा बडा नेता गळाला लावल्याची माहिती मिळाली आहे. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. आता बरोरा उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. ऐन निवडणुकीच्या आधी या राजकीय भूकंप झाल्याने शिंदे गटाचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Ajit Pawar : ‘त्या’ भूखंडाची विचारपूस केली पण… अजितदादांनी फेटाळले बोरवणकरांचे आरोप
माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे वडील चार वेळा शहापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या भागात बरोरा कुटुंबियांचा मोठा दबदबा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार उद्या (गुरुवार) सायंकाळी पांडुरंग बरोर हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
2019 मध्येच सोडली होती राष्ट्रवादीची साथ
माजी आमदार बरोरा आधी राष्ट्रवादीतच होते. मात्र, सन 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर बरोरा यांनीही शिवसेना सोडली होती. त्यानंतर मागील काही दिवसांपासून ते शिंदे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शिंदे गटाकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही. अखेर बरोरा उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
‘देशात मोदी-शहांचा पर्सनल लॉ, अध्यक्षांच्या हाती मात्र तुणतुणे; ठाकरे गटाचा हल्लाबोल
बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाने शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार पुन्हा पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. ठिकठिकाणी सभा, मेळावे बैठका घेतल्या जात आहेत. निवडणुकीआधी या घडामोडींना वेग आला आहे. त्यातच फोडाफोडीचेही राजकारण सुरू झाले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी बरीच पक्षांतरे पाहण्यास मिळतील, अशी चिन्हे दिसत आहेत.