लोकसभेसाठी ठाकरे गटाचे ११ उमेदवार ठरले, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार ?

  • Written By: Published:
लोकसभेसाठी ठाकरे गटाचे ११ उमेदवार ठरले, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार ?

Lok Sabha elections 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच (Lok Sabha elections) वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारी सुरू झालीये. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली. मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अशातच ठाकरे गटाने आपल्या अकरा उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.

Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू 

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. लोकसभा निवडणुका जसजशी जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीत जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने लवकरच जागावाटपाचा तिढा लवकरच सुटणार असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, त्यापूर्वी ठाकरे गटाने अकरा जागांवर आपला दावा केला आहे. त्यात वायव्य मुंबईतून अमोल कीर्तिकर तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून विनायक राऊत आणि छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावांवरही शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Article 370 Trailer: ‘संपूर्ण काश्मीर…’ यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’चा दमदार ट्रेलर रिलीज 

ठाकरे गटाने शिक्कामोर्तब केलेले उमेदवार
शिर्डी – भाऊसाहेब वाकचोरे
बुलडाणा – नरेंद्र खेडेकर
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
वायव्य मुंबई – अमोल कीर्तिकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
परभणी – संजय जाधव
ठाणे – राजन विचारे

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. या जागावाटपाला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाने 11 जागांवर आपले उमेदवार निश्चित केले. त्यामुळं महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचं बोलल्या जातं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube