सिल्व्हर ओकवर ‘काका मला वाचवा’चे प्रयोग चालू; शिरसाटांची डायलॉगबाजी

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 20T175805.270

Sanjay Shirsat On Mahavikas Aaghadi :  शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पुढच्या निवडणुकीत काय होईल ते 2024 साली कळेल. आदित्य ठाकरेंनी बालिशपणाचे स्टेटमेंट देणं बंद करावं, असे ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी मतदारसंघातून  निवडणुक लढवण्याचे आव्हान दिले आहे. यावर शिरसाटांना आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. आदित्य ठाकरे बाळ आहे, तो चिल्लर असून त्याला अजून राजकारण शिकायचे आहे, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणाला चॅलेंज करतोय तू, तुझा जन्मा झाला नव्हता तेव्हापासून आम्ही शिवसेना पाहिली आहे. तुला काय राजकारण कळतं. शायनिंग मारणं, हातवारे करणं म्हणजे राजकारण होत नसतं, अशा शब्दांमध्ये शिरसाटांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Karnataka : सिद्धरामय्यांच्या शपथविधीला पवारांची ‘खास’ उपस्थिती; विरोधकांच्या एकजुटीकडे ठाकरेंनी फिरविली पाठ

राजकारणामध्ये लोकांच्या घरी जाऊन काम करावे लागते. तुमचा पोपट फक्त मेला नसून त्याचा अंत्यसंस्कारदेखील झाला आहे. त्याचा दिवस घालायला संजय राऊतसारखे कार्यकर्ते बसलेले आहे. तुम्ही त्याची काळजी करा. कोणत्या निवडणुकीत काय होईल ते 2024 सालच्या निवडणुकीला कळे, असे शिरसाट म्हणाले.

Siddaramaiah On PM Modi: मोदींच्या शुभेच्छांना सिद्धरमय्यांचे उत्तर; शपथविधी दिवशीच काँग्रेस-भाजप संर्घषाला सुरूवात

वज्रमूठ वगैरे काहीही राहिलेले नाही. आता प्रत्येक जण मूठी आवळायला लागलेले असून एकमेकांना ठोसे मारायला लागलेले आहे. सिल्व्हर ओक हे त्यांचे बैठकांचे ठिकाण झाले आहे. उद्धव ठाकरे पुन्हा पायपुसणीला तिथे जातील आणि म्हणतील काका मला वाचवा. या अगोदर अजितदादा म्हणायचे काका मला वाचवा. त्याआधी धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंना म्हणायचे काका मला वाचवा. त्यानंतर आता उद्धव ठाकरे म्हणत आहे. काका मला वाचवाचे प्रयोग सिल्व्हर ओकवर सुरु आहे, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

Tags

follow us