वर्ध्यात शरद पवार गटाला खिंडार! माजी केंद्रीय मंत्र्याने धरला अजित पवारांचा हात…

वर्ध्यात शरद पवार गटाला खिंडार! माजी केंद्रीय मंत्र्याने धरला अजित पवारांचा हात…

राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवार गटाला तर काहींनी अजित पवार गटाला समर्थन दिलंय. अशातच आता वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला खिंडार पडलं आहे. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरद पवार गटाचा राजीनामा देत अजित पवारांचा हात धरला आहे. मोहिते यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 50 पदाधिकाऱ्यांनीही आपला राजीनामा देत अजित पवार गटाला समर्थन दिलंय. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मोहितेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे आणखी बडे नेतेही राजीनामा देणार असल्याचं बोललं जातंय.

पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांची धडपड, प्रविण दरेकरांची टीका…

अजित पवार आपल्या समर्थकांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. एवढंच नाहीतर अजित पवारांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादीमुळे चांगलंच रणकंदन सुरु झालंय.
राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे गट पडल्याने दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलंय. तर शरद पवारांनी राज्यभर दौरा करीत पुन्हा संघटना मजबूत करण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच वर्धा जिल्ह्यातून मोहितेंचा राजीनामा हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

Bharat Jadhav: “हे शहर आता…,” भरत जाधवने थेटच सांगितले मुंबई सोडण्यामागचं खरं कारण…

कोण आहेत सुबोध मोहिते?
सुबोध मोहिते यांनी मे 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघटना, शिवसंग्राम अशा विविध राजकीय पक्षामधून त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास झाला आहे. यापूर्वी 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मंत्री असलेल्या महादेव शिवणकर यांचे ते खासगी सचिव होते. 1999 साली शिवसेनेतून बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना रामटेकमधून तिकीट दिले आणि बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव करत ते खासदार झाले.

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

पहिल्याच टर्ममध्ये मोहिते यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. पुढे 2004 मध्येही त्यांचा पुन्हा विजय झाला. मात्र शिवसेनेतील नारायण राणे यांच्या बंडानंतर मोहिते यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट् केला.

नारायण राणेंसोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. याशिवाय काँग्रेसकडून विधान परिषदेवर जाण्याचीही त्यांची संधी हुकली. बंडानंतर संसदीय राजकारणात परतण्यासाठी मोहिते अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube