ठाकरे बंधू पुन्हा एकत्र! मातोश्रीवर राज ठाकरेंचा सहकुटुंब स्नेहभोजन कार्यक्रम, युतीच्या चर्चेला नवं वळण
उद्धव ठाकरेंसोबत आजची भेट कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

Thackeray Borther Meet On Matroshree : महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज 12 ऑक्टोबर रोजी सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी दाखल झाले होते. त्यांनी उद्धव ठाकरे कुटुंबासोबत स्नेहभोजन केलं आहे. या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या नात्यातील जवळीक पुन्हा दृढ झाल्याचं राजकीय वर्तुळात स्पष्टपणे दिसत आहे. तीन महिन्यातील ही सहावी भेट आहे. उद्धव ठाकरेंसोबत आजची भेट कौटुंबिक असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. तरीपण राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
मातोश्रीवर स्नेहभोजन…
मागील काही महिन्यांत ठाकरे बंधू (Thackeray Borther) अनेकदा एकत्र दिसले आहेत. 5 जुलै 2025 रोजी मराठी भाषा मेळाव्यात दोघेही एकाच मंचावर आले होते, त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर गेले होते. त्याचप्रमाणे 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली. पुढे 10 सप्टेंबरला गणेश मुहूर्तावर, तसेच 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू (Udhhav Thackeray) पुन्हा एकत्र दिसले. आणि आता, 12 ऑक्टोबरला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी पोहोचले. ज्यामुळे या भेटींची मालिका अधिक गहिरी झाली आहे.
निवडणुका जवळ आल्याने…
मातोश्रीवर आज उपस्थित होते. राज ठाकरे (MNS), शर्मिला ठाकरे, राज ठाकरेंची आई, अमित ठाकरे, मिताली ठाकरे आणि उर्वशी ठाकरे. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Shivsena) कुटुंबीयांनीही त्यांचे आत्मीय स्वागत केले. राजकीय दृष्टिकोनातून ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुका जवळ आल्याने, मनसे आणि ठाकरे गट (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा गती मिळाल्याचं पाहायला मिळतं.
भेट केवळ कौटुंबिक?
गेल्या दोन दशकांपासून दूरावलेले ठाकरे बंधू, मागील काही महिन्यांत सलग पाच वेळा भेटले आहेत. त्यामुळे राजकारणात आता मोठ्या युतीचा संकेत मिळतो आहे. ठाकरे कुटुंबीयांची ही सहभोजनाची भेट केवळ कौटुंबिक नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं समीकरण देणारी ठरू शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात आहे.