नाव माहित नसलेल्यांना ‘भारतरत्न’, पण सावरकरांना नाही; संजय राऊतांची टीकेची तोफ
Sanjay Raut : नावं माहित नसलेल्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलायं, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागलीयं. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केलीयं. यावेळी बोलताना त्यांनी सावरकरांना आधी भारतरत्न पुरस्कार द्या मगच बोला, अशी मागणी केलीयं.
रामदेव बाबांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पतंजलीला कोट्यवधीचा दंड
संजय राऊत म्हणाले, मागील काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना राजकीय रणनीतीकार हा शब्द वापरण्या येत आहे. स्वांतत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहेत. ते राजकीय रणनीतीसाठी नाहीत. सावरकरांचा जर सन्मान करायचाच असेल तर आधी त्यांना तुम्ही भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करा, मगच बोला, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते; राज ठाकरेंचा टोला
तसेच लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारकडून अनेक राज्यातील नेत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. ज्यांची नावंही माहिती नाहीत अशांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. मला कोणावर टीका करायची नाही परंतू सरकारने राजकीय रणनीती असा शब्द वापरण्यापेक्षा त्यांना भारतरत्न पुरस्कारानने सन्मानित करावं, अशी मागणी संजय राऊतांनी केलीयं.
फडणीस आहेत म्हणून व्यंगचित्रकार झाले, फडणवीस असते तर व्यंगचित्र झाले असते; राज ठाकरेंचा टोला
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सडकून टीका केलीयं. मुख्यमंत्री शिंदे हे मौलवीच्या वेशात दिल्लीत जाऊन मंत्री अमित शाहा यांना भेटत होेते. अजित पवार आणि शिंदे यांनी बनावट ओळखपत्रे बनवलेली आहेत. यासंदर्भात खुद्द अजितदादांनीच या नाट्यकलेबाबत सांगितलं. या प्रकरणाची एएनआय चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी संजय राऊतांनी यावेळी केलीयं.