‘फिर भी मेरी दाढी सफेद सांगणारा बदमाश’; भाषणाच्या सुरुवातीलाच अंधारेंनी भुसेंची दाढी कुरवाळली

‘फिर भी मेरी दाढी सफेद सांगणारा बदमाश’; भाषणाच्या सुरुवातीलाच अंधारेंनी भुसेंची दाढी कुरवाळली

Sushma Andhare On Dada Bhuse : ललित पाटीलसारख्यांना पाठीशी घालणारे नेते नाशिकमध्ये आहेत, फिर भी मेरी दाढी कैसी सफेद हे सांगणारा बदमाश म्हणून नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांची दाढी कुरवाळली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत आहे. या अधिवेशनादरम्यान बोलताना अंधारेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच दादा भुसेंवर थेट भाष्य केलं आहे.

‘आता भाजपमुक्त श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मोदींची तुलना, शक्यच नाही’; ठाकरेंनी ठणकावलं

सुषमा अंधारे म्हणाल्या, नाशिक अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. एमडी ड्रग्जचे साठे सापडतात म्हणून नाशिक प्रसिद्ध. तसेच ललित पाटीलसारख्या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे काही नेते नाशिकमध्येच आहेत, फिर भी मेरीही दाढी कैसी सफेद है असं सांगणारे बदमाश इथे आहेत म्हणूनच नाशिक जिल्हा चर्चेत असल्याचा टोला सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंना लगावला आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण राज्यात चांगलच गाजलं होतं. सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे हे ललित पाटील यांना मदत करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भुसेंनीही सुषमा अंधारेंचा खडसावून समाचार घेत आरोप फेटाळून लावले होते.

राम मंदिराला 101 किलो सोनं दान करणारे दिलीप लाखी कोण? मुंबईशी आहे कनेक्शन…

तसेच यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावरही शेरोशायरी करीत धारेवर धरलं आहे. उडता तीर अंगावर घेत मीच बडी अन् छोटी भाभी म्हणणारे लोकंही नाशिकमध्येच असल्याचं देवयानी फरांदे यांचं नाव घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मिळालेल्या निनावी पत्रावरुन सुषमा अंधारे यांनी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मला निनावी पत्र प्राप्त झाले. ती मी पुणे पोलिसांना दिले आहे. पत्रात जे संदर्भ दिलेत त्यात कुठलाही पुरावा नाही. या पत्रात छोटी भाभी उर्फ शेख याला अटक केली तर बडी भाभी कोण? असा म्हणत अंधारेंनी अप्रत्यक्षपणे देवयानी फरांदे यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

दरम्यान, सुषमा अंधारे यांनी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेवरुन उद्धव ठाकरे यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याचं दिसून आले आहेत. त्या म्हणाल्या, राम आमच्या अस्थेचा श्रद्धेचा विषय पण काल भाजपने पॉलिटीकल टूल कीट करण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला आनंद राम हे एकवचनी, एकबाणी, एकपत्नी अशी त्यांची व्यक्तीरे आहे. रामाचे खरे अनुयायी उद्धव ठाकरे हेच शोभता, मी बाई म्हणून त्यांचे विशेष आभार मानले पाहिजे, कारण देशात, राज्यात अर्धी महिलांची लोकसंख्या राम हे एकपत्नी, एकवचनी होते म्हणूनच काल उद्धव ठाकरे दर्शनाला गेलेत तेव्हा ठाकरेंनी सन्मानाने महिला म्हणून रश्मी वहिनींचे अधिकार कुठेही डावलले नाहीत. ठाकरेंनी वहिनींना सगळे अधिकार दिले पण काल आम्ही पाहिलं की बाकी नेते एकटेच तुरूतुर जात होते, त्यांची पत्नी वणवासात. याचं वाईट वाटतं पण ठाकरे आमच्यासाठी आदर्श आहात असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube