Sanjay Raut : तुरुंगातले अनुभव, किस्से अन् बरंच काही…’बोध कीर्तन’ पुस्तकातून कोणता गौप्यस्फोट?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकानंतर आता नवीन बोध कीर्तन पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे.

Sanjay Raut

Sanjay Raut Book Bodh Kirtan : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नरकारतला स्वर्ग पुस्तकानंतर आता आणखी एक नवीन पुस्तक वाचकांसाठी येणार आहे. ‘बोध कीर्तन’ (Bodh Kirtan) असं या नव्या पुस्तकाचं असून खुद्द संजय राऊत यांनीच नव्या पुस्तकाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरुन पोस्ट करत माहिती दिलीयं. मागील वर्षी संजय राऊतांचं नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाला वाचक वर्गातून तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता संजय राऊत यांंचं नवीन पुस्तक वाचकांच्या भेटीला येत आहे.

खासदार संजय राऊत यांचे ‘बोध कीर्तन’ पुस्तक मेहता पब्लिकेशनकडून प्रसिद्ध होणारे दुसरे पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकाची छोटीशी झलक! एक अनोखे पुस्तक! या शब्दांत खासदार राऊत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा फोटोदेखील शेअर केला आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच वाचक वर्गाकडून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकात नेमकं काय?
मागील वर्षी प्रकाशित झालेलं नरकारतला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊत यांनी ऑर्थर रोड जेलमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. या पुस्तकामुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन मुंबईत झालं होतं, त्यानंतर इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन दिल्लीत झालं. नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊत यांनी तुरुगांत घेतलेले अनेक अनुभव शेअर केले होते. त्यानंतर आता ‘बोध कीर्तन’ पुस्तकामध्येही संजय राऊत यांना तुरुंगात आलेल्या अनुभवांचं विश्लेषण वाचण्यास मिळणार आहे. एवढंच नाही तर तुरुगांतील अनेक किस्से आणि बरंच काही असणार आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात 2014 मध्ये भाजपनं केंद्रात मिळवलेली सत्ता, ईडीच्या देशभरातील कारवाया, ईडीकडून संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई, तुरुंगातील प्रसंग, तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचे अनुभव, कुटुंबीयांची साथ अशा अनेक मुद्यांवर भाष्य केलं. बोध कीर्तन पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून या पुस्तकातून संजय राऊत कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

follow us