मुंबईत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का; कोणाकोणाच्या नातेवाईकांना करावा लागला पराभवाचा सामना?

शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असून अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

  • Written By: Published:
Untitled Design (267)

The families of many leaders in Mumbai were shocked by the defeat : महापालिका निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपने यात आघाडी घेतली असून यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी घराणेशाहीविरोधात स्पष्ट भूमिका घेतल्याचं चित्र आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या निकालांचा मोठा फटका बसल्याच दिसून येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असून अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयीची झाले आहेत.

समाधान सरवणकर पराभूत

मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मधून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी 603 मतांनी विजय मिळवला. समाधान सरवणकर यांनी ईव्हीएम मतमोजणीवर आक्षेप घेतला होता, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला.

महाडेश्वर कुटुंबाचा विजय

शिवसेना उबठाचे माजी महापौर दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर यांची कन्या पूजा महाडेश्वर यांनी प्रभाग क्रमांक 87 मधून विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

रवींद्र वायकरांना मोठा धक्का

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव झाला असून, ठाकरे गटाच्या लोणा रावत यांनी त्यांच्यावर मात केली आहे.

धंगेकरांना पराभवाचा तिसरा धक्का; कोमकर हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेल्या सासू व सुना विजयी

ठाकरे गटातील आणखी एक यश

शिवसेना उबठाचे नेते मनोज जामसूतकर यांची कन्या सोनम जामसूतकर यांनी प्रभाग क्रमांक 210 मधून विजय मिळवला आहे.

नवाब मलिकांना धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनाही या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे बंधू कप्तान मलिक यांचा पराभव झाला असून, प्रभाग क्रमांक 165 मधून काँग्रेसचे आशरफ आझमी विजयी झाले आहेत.

दरेकर बंधूंचा विजय

प्रभाग क्रमांक 3 मधून भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी गायकवाड यांचा पराभव केला.

पिंपरी-चिंचवड प्रभाग 25 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलले! कलाटेंच्या प्रवेशाची भाजपची खेळी यशस्वी

योगिता गवळी पराभूत

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता गवळी यांना भायखळा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. भाजपच्या उमेदवाराने त्यांच्यावर विजय मिळवला.

वैशाली शेवाळेंचा पराभव

धारावीतील प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा काळे यांनी 1450 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आहेत.

तेजस्वी घोसाळकर विजयी

दरम्यान, भाजपच्या उमेदवार आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

follow us