बहिणींवर अत्याचार होत असतांना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधत फिरतोय, ठाकरेंची CM शिंदेंवर टीका
Uddhav Thackeray : बदलापूरच्या (Badlapur) शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेर्धात आज (24 ऑगस्ट) रोजी महाविकास आघाडीकडून (MVA) तोंडाला पट्ट्या लावून सरकार विरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आलं. शिवसेना भवन येथे भर पावसात महिला आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली.
‘मी रस्त्याने येणार होतो,मात्र रस्ता खराब …’, आठवलेंनी दिला सरकारला घरचा आहेर
एकीकडे बहिणीवर अत्याचार होतोय आणि दुसऱ्या बाजूला कंसमामा ऱाख्या बांधत फिरतोय, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला.
शिवसेना भवन परिसरात जमलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचं आंदोलन हे विकृती विरुध्द संस्कृतीचं आहे. त्यामुळे आता धूळ खात पडलेला ‘शक्ती कायदा’ लागू करण्याची मी महामहिम राष्ट्रपतींना विनंती करतो. सरकार निर्लज्जपणे वागत आहे. हा महाराष्ट्र साधूसंताचा आहे. फुले शाहू, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मात्र विकृत नराधमांवर पांघरूण घालणारे भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
Ground Zero : नाना पटोले पुरुन उरणार? ‘साकोली’ भाजपला अवघडच!
यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अजय चौधरी यांच्यासह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
पुढं बोलतांना ठाकरे म्हणाले, एकीकडे बहिणीवर अत्याचार होतोय आणि दुसऱ्या बाजूला कंसमामा ऱाख्या बांधत फिरतोय, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला. नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. जरी तुम्ही आमच्या बंदला बंदी केली असली तर आज महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयात आणि घराघरात या अत्याचाराविरुद्ध मशाल धगधगत आहे, असं ठाकरे म्हणाले.
बदलापूरच्या दृष्कृत्य झाल्यानंतर सरकारने खणखणीत भूमिका घ्यायला पाहिजे होती. मात्र, सरकार आरोपींवर पांघरून घालतेय. अशावेळी लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नसतो. मी राज्यातील सर्व जनतेला आवाहन करतो, आपल्या गावागावात, शहरात ‘बहीण सुरक्षित, घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम राबवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.