राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काहींना शेतात का जावं लागतंय?, उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला…
Uddhav Thackeray : महायुतीला (Mahayuti) राज्यात बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मुंबईत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. अशातच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) हे सध्या त्यांच्या मूळ गावी साताऱ्यात (Satara) आहेत. सत्ता स्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं चर्चांना उधाण आलं. यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिंदेंवर निशाणा साधला.
राज्यात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी केव्हा होणार? नार्वेकरांनी थेट तारीखच सांगितली
राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लगावला.
ईव्हीएमवर विरोधात बाबा आढाव यांचे मागील तीन दिवसांपासून पुण्य़ात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. आज शरद पवार, अजित पवार यांनी आढाव यांच्या आंदोलनाला भेट दिली. तर आता उद्धव ठाकरेंनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, बाबा आढाव यांची आजची ही भेट ही आयुष्यभर लक्षात राहिल. आजही ते म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत. आज जिंकलेले आणि हरलेले देखील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला भेटी देत आहे. कारण, निकालावर जिंकलेल्यांचा विश्वास नाही आणि हरलेल्यांचा आपण हरलो तरी कसे, यावर विश्वास नाही, असं ठाकरे म्हणाले.
Video : उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर ईव्हीएमविरोधातील बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन मागे
ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल…
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राक्षसी बहुतमत मिळालं, मग आनंदी वातावरण का नाही? सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय? त्यांनी राजभवनात जायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता विधानसभेची मुदत संपलेली असताना राष्ट्रपती राजवट का लागली नाही, असा सवाल ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी आम्ही ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आंदोलन करणार आहोत. ही फक्त सुरूवात आहे. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे, असंही ते म्हणाले.
यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, सुषमा अंधारे आदी उपस्थित होते.
शिंदेची प्रकृती बिघडली…
एकनाथ शिंदेंची तब्येत अगोदरच काहीशी बरी नसल्याने त्यांनी मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच या गुरुवारी मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांनी अचानक सातारा येथील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील सत्ता स्थापनेची गडबड व बैठका सोडून काल (दि. 30) संध्याकाळी ते हेलिकॉप्टरने गावी पोहोचले. पण, आता त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याची माहीती आहे.