तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच..,; अजितदादांच्या शिलेदाराने ठणकावले

तानाजी सावंतांना बाहेर काढा, अन्यथा आम्हीच..,; अजितदादांच्या शिलेदाराने ठणकावले

Umesh Patil On Tanaji Sawaant : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना महायुतीतून बाहेर काढा अन्यथा आम्हीच बाहेर पडतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शिलेदार उमेश पाटील यांनी ठणकावलंय. दरम्यान, सावंत यांनी महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी महायुतीला बाहेर पडण्याचा इशारा दिलायं.

मंत्री आठवलेंच्या उपस्थितीत नगरमध्ये संविधान सन्मान मेळावा, आमदार जगताप यांची माहिती

उमेश पाटील म्हणाले, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री केलं आहे. ज्या भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केलंय, त्यांनी अजित पवार राष्ट्रवादीला महायुतीत घेतलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकले आहेत. म्हणूनच तानाजी सावंत आज मंत्री आहेत. तानाजी सावंत यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, पण त्यांची विधाने पाहून त्यांची लाज वाटू लागलीयं. त्यांची अशी भाषा ऐकून घ्यायला राष्ट्रवादी काँग्रेस मोकळी नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत, कुणाच्या घरचं खात नाही, तानाजी सावंतांना महायुतीतून बाहेर काढा नाहीतर आम्हीच बाहेर पडू, असा थेट इशाराच पाटील यांनी दिलायं.

Vedaa OTT: ‘वेदा’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज, कधी? कुठे? बघता येईल जाणून घ्या

तसेच तानाजी सावंतांचं असलं ऐकून घेण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं चांगलं. आपण काय सत्तेला लाचार आहोत का? हे कोण आहेत तानाजी सावंत त्यांनी महायुतीत राष्ट्रवादीला प्रवेश दिला का? एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातलं सरकार आहे. शिंदेंना मुख्यमंत्री केलं म्हणून तानाजी सावंतांना मंत्री करता आलं. अजित पवार यांना भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांनी महायुतीत घेतलं आहे. भाजपने हा निर्णय घेतलं असल्याचा टोला पाटील यांनी लगावलायं.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?
धाराशिवमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, बोलताना तानाजी सावंत म्हणाले, मी एक हाडामासाचा शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आपलं कधीच पटलं नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत पटलं नाही. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही, असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं.

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या विधानानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. तानाजी सावंत यांना नेमकं कशामुळे उलट्या होतात हे माहिती नाही, ते आरोग्यमंत्री आहेत. त्यांच्या आरोग्याचा काही संबंध असेल. महायुतीत असल्याने त्यांना उलट्या होत असतील तर त्याचं कारण एकनाथ शिंदे हेच सांगू शकतील, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube