मंत्री आठवलेंच्या उपस्थितीत नगरमध्ये संविधान सन्मान मेळावा, आमदार जगताप यांची माहिती

  • Written By: Published:
मंत्री आठवलेंच्या उपस्थितीत नगरमध्ये संविधान सन्मान मेळावा, आमदार जगताप यांची माहिती

Constitution honor meeting in Ahmednagar अहमदनगर :अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सहकार सभागृह येथे 2 सप्टेंबर रोजी संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) व प्रा. जोगेंद्र कवाडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दिली.

Sushma Andhare : पोल्ट्री फार्म ते खासदारकी; सुषमा अंधारेंनी राणेंचा इतिहासच काढला

संविधान सन्मान महामेळावा संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, या मेळाव्याला आंबेडकरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी इंडिया आघाडीने एनडीए सरकार संविधान बदलणार असा अप्रचार केला व तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टंट होता. त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे 2 सप्टेंबर 2024 रोजी अहमदनगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी चार चार वाजता आयोजित केला आहे.

विनोद तावडेंचा पश्चिम महाराष्ट्रात मोठा डाव; शरद पवार गटाच्या नेत्याशी बंद दाराआड खलबत

या संविधान सन्मान महामेळावामध्ये रामदास आठवले यांची सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार तसेच नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र शिवाजीराव गर्जे यांची विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे, जयदीपभाई कवाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे हे उपस्थित राहणार आहे. तसेच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप हे असणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube